या पोस्ट मध्ये आपण महात्मा गांधी निबंध | Mahatma Gandhi Essay In Marathi निबंध लेखन करणार आहोत
Mahatma Gandhi Essay In Marathi
निबंध लेखन – महात्मा गांधी निबंध मराठी
[मुद्दे : भारताचा राष्ट्रपिता – सर्व जगाला वंदनीय – दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर झालेली अन्यायाची जाणीव – अन्यायाला विरोध – भारतात परतल्यावर विविध लढे – पीडितांच्या मदतीला जाण्याची वृत्ती.]
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे संपूर्ण जगाला आदर्श व वंदनीय आहेत. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म १८६९ साली पोरबंदर येथे झाला. त्यांच्याकडे कोणतेही अधिकारपद नव्हते. पण ते भारताचे महान नेते बनले.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. जगाने त्यांना ‘महात्मा’ म्हणून गौरवले आहे, वकिली करण्यासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले, पण तेथील युरोपियन राज्यकर्ते हिंदी माणसांवर जो अत्याचार करत होते, त्यामुळे गांधीजी बेचैन झाले.
त्या वेळी त्यांनी तेथे अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह केला. तो जगभर गाजला. १९१९ साली जालियनवाला बागेतील हत्याकांडाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली.
त्यासाठी त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घालण्याची चळवळ उभारली. १९३० साली त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. १९४२ साली ‘चले जाव’ ही चळवळ केली. जेथे दु:ख असेल तेथे गांधीजी धावले.
महारोग्यांची सेवा केली. ते स्वातंत्र्यासाठी झगडले. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी कोणतेही सत्तेचे पद स्वीकारले नाही. असा हा महात्मा १९४८ साली पंचतत्त्वात विलीन झाला.
महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi Nibandh Marathi
वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता
- महात्मा गांधी वर मराठी निबंध / Mahatma Gandhi Marathi Nibandh
- महात्मा गांधी निबंध लेखन करा / Essay Writing On Mahatma Gandhi In Marathi
- 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती मराठी निबंध / 2 October Mahatma Gandhi Jayanti Essay In Marathi
हे सुद्धा वाचा :
- परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध
- मी खुर्ची बोलत आहे मराठी निबंध
- एका पुतळ्याचे मनोगत मराठी निबंध
- वर्गातील बाकांचे मनोगत मराठी निबंध
आम्हाला आशा आहे की महात्मा गांधी मराठी निबंध लेखंन / Essay On Mahatma Gandhi In Marathi निबंध लेखन नक्कीच आवडले असेल धन्यवाद,