परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध | Pariksha Radda Zalya tar Essay In Marathi In 100 Best Words

WhatsApp Group Join Group

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण परीक्षा रद्द झाल्या तर.. / Pariksha Radda Zalya Tar Essay In Marathi  हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये  करणार आहे.

Parikha Radda Zalya tar Marathi Nibandh

Parikha Radda Zalya tar Marathi Nibandh

निबंधलेखन  – परीक्षा रद्द झाल्या तर..

(मुद्दे : परीक्षा नसत्या तर हा विचार मनात आणणारा प्रसंग-वर्षअखेरीला तीन तासांत तपासणी ही चुकीची पद्धत-परीक्षेमुळे विदयार्थ्यांमध्ये भेदभाव-परीक्षेचा चुकीचा अर्थ-परीक्षा नसेल तर अनागोंदी-मिळालेल्या ज्ञानाची तपासणी म्हणजे परीक्षा-जीवनात प्रत्येक क्षणाला परीक्षा-परीक्षा नसेल तर कामे अशक्य-प्रगती अशक्य)

अगदी परवा परवाची बातमी आहे ही. परीक्षेतील एक पेपर वाईट गेला, म्हणून एका शाळेतील नववीच्या एका मुलाने आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलाने. शाळेत, परिसरात एकच हलकल्लोळ माजला. काय झाले, कसे झाले, हे समजून घेता घेता तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मुलाने आत्महत्या केली आणि सर्वजण पूर्णत: कोलमडलेच. बातम्यांना ऊत आला.

चर्चावर चर्चा घडू लागल्या. उलटसुलट मतमतांतरे व्यक्त होऊ लागली. मीसुद्धा चक्रावलेच होते. वाटले, मुलांना जीवच नकोसा करणाऱ्या या परीक्षा हव्यातच कशाला? त्या नसत्या तर…? परीक्षेमागोमाग येणारा निकालाचा बडगा व्यक्तीच्या साऱ्या सुखावर, आनंदावर हल्ला करतो. वर्षभर केलेल्या. अभ्यासाची परीक्षा केवळ तीन तासांत घेतली जाते. एखादया क्षणी आपली मती चालत नाही.

सहज सुटणारी गणिते परीक्षेत सुटत नाहीत. नेहमीच्या गोष्टी आठवत नाहीत. नेहमी चालणारी लेखणी त्या काळात रुसून बसते आणि मग परीक्षेसाठी नेमलेले ते तीन तास संपून जातात आणि जाता जाता आपल्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा करून जातात. क्वचित एखादया अवघड क्षणी आपल्या भाळी ‘नापासा’चा बट्टाही लागतो.

साऱ्या भोवतालच्या जगाकडून त्यामुळे आपण नालायक ठरवले जातो. परीक्षेत नापास झालेल्या अनेकांनी पुढे आपल्या जीवनात मोठी कामगिरी केलेली आढळते; पण हे त्या क्षणी कोणी लक्षात घेत नाही, परीक्षाच नसती, तर हे टळले असते. परीक्षा नसतात तोपर्यंत सर्वजण एकाच पातळीवर असतात. परीक्षेनंतर काही हुशार, काही ढ ठरतात.

परीक्षेनंतर काही यशस्वी, तर काही अयशस्वी ठरतात. परीक्षांतील टक्केवारी जीवनात मोठे बदल घडवते, हे लक्षात आल्यावर मग परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी वाटेल ते मार्ग स्वीकारले जातात. परीक्षेत कॉपी करणे, पेपर फोडणे, खऱ्या परीक्षार्थीऐवजी दुसराच कोणीतरी परीक्षेला बसणे हे उपद्व्याप खूप वाढलेत.

आपल्याकडे मराठवाड्यात परीक्षा केंद्रावर शेकडोंनी माणसे जमतात आणि खिडक्यांतून कॉपी सरकवतात. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे बाहेर मोठमोठ्याने ओरडून सांगतात. बिहारमध्ये तर परीक्षा केंद्राच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत सर्व खिडक्यांवर बाहेरून चढतात आणि कॉपी करायला मदत करतात. शेकडो लोक केंद्रावर जमून बिनदिक्कत हे प्रकार करतानाचे दृश्य परवाच टीव्हीवर दाखवत होते!

परीक्षा नसत्या तर हे घाणेरडे प्रकार घडलेच नसते. खरे तर परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून मुलांचे यश वा अपयश मापण्याची सवय लागल्यानंतर समाजाचीही घसरगुंडी व्हायला लागली. माणसांची मती फिरली. परीक्षेचा विपरीत अर्थ रूढ झाला आणि ही परीक्षाच नसती तर?’ असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. परीक्षा नसती तर मात्र अनागोंदी माजली असती.

कारण वर्षभर अभ्यास केल्यावर आपल्याला ज्ञान मिळाले की नाही, हे कसे तपासले असते? किती ज्ञान मिळाले? ते कोणत्या दर्जाचे आहे? हे कसे समजले असते? परीक्षा नसेल तर पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत कसे जाता येईल? आपण परीक्षेचा चुकीचा अर्थ मनात बाळगला आणि घोटाळा झाला. ठरावीक पुस्तकातील माहिती सांगितलेल्या वेळेत लिहिणे म्हणजे परीक्षा, ही आपली परीक्षेची कल्पना.

जो पुस्तकातील माहिती जशास तशी लिहील तो हुशार. खरे तर जीवनात प्रत्येक क्षणाला आपण परीक्षा देत असतो आणि घेत असतो. एखादया हॉटेलमधील पदार्थ आपल्याला आवडले नाहीत, तर आपण पुन्हा तेथे जात नाही, म्हणजे आपण त्या हॉटेलला नापास करतो.

अहो, गायसुद्धा गवत खाण्यापूर्वी ते हुंगून बघते. ज्याला गाडी नीट चालवता येत नाही, त्याच्या गाडीत आपण बसू का? ज्याला घर बांधण्याची माहिती नाही, त्याने बांधलेल्या घरात आपण राहू का? म्हणून नोकरीवर एखादयाची परीक्षा घेऊनच नेमणूक केली जाते.

परीक्षा नसेल तर समाजाची कामेच होणार नाहीत आणि झाली, तरी दर्जेदार होणार नाहीत. मग प्रगती अशक्य. याचा अर्थच हा की प्रगती हवी असेल, तर परीक्षा घ्यावीच लागेल. म्हणून ‘परीक्षा नसत्या तर…?’ हा प्रश्नच निरर्थक आहे.

परीक्षा रद्द झाल्या तर निबंध | Pariksha Radda Zalya Tar Nibandh In Marathi

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा लिहू शकता

  • परीक्षा रद्द झाल्या तर  निबंध मराठी / pariksha radda jhalya tar  nibandh marathi
  • परीक्षा रद्द झाल्या वर मराठी निबंध  / pariksha radda zalya var nibandh marathi
  • परीक्षा नसत्या तर मराठी निबंध / pariksha radda nibandh marathi

मराठी मध्ये छान छान माहिती वाचण्यासाठी : येथे क्लिक करा 

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा परीक्षा रद्द झाल्या तर.. मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

WhatsApp Group Join Group

Comments are closed.