संत नामदेव महाराज पुण्यतिथि संदेश, अभंग, स्टेटस, इमेजेस, कोटस, फोटो इन मराठी | Sant Namdev Maharaj Punyatithi 2021 SMS, Awesome Abhang, Quotes, Status, Photo, Images Messages In Marathi

WhatsApp Group Join Group

भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले . (Sant Namdev Maharaj Punyatithi Messages In Marathi) वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. या श्री संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची आज 6 ऑगस्ट रोजी पुण्यतिथि आहे त्यासाठी मराठी स्पीक्स श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथि (Sant Namdev Maharaj Punyatithi Message in Marathi) संदेश, मेसेज, सुविचार, अभंग घेऊन आलो आहोत ते तुम्ही Whatsapp, Sharechat, Facebook आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता..

Shri Sant Namdev Maharaj Punyatithi Quotes In Marathi

Sant Namdev Maharaj Punyatithi Banner In Marathi

Sant Namdev Maharaj Punyatithi Suvichar In Marathi

नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जागी ||
श्री संत शिरोमणी
श्री नामदेव महाराज
पुण्यतिथी निमित्त
💐🙏 विनम्र अभिवादन 🙏💐

Sant Namdev Maharaj Punyatithi sms In Marathi

राष्ट्रसंत नामदेव महाराज
पुण्यतिथी निमित्त
💐🙏 विनम्र अभिवादन 🙏💐

Sant Namdev Maharaj Punyatithi Sandesh In Marathi

संत शिरोमणी नामदेव
महाराज यांच्या पुण्यतिथी
💐🙏 निमित्त विनम्र अभिवादन🙏💐

श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथि संदेश मराठी 

महाराष्ट्रातील वारकरी संतकवी
श्री संत नामदेव महाराज
यांना पुण्यतिथी निमित्त
🙏💐 शतः शतः नमन 💐🙏

संत नामदेव महाराज पुण्यतिथि फोटो इन मराठी 

Sant Namdev Maharaj Punyatithi Images In Marathi

संत नामदेव महाराज पुण्यतिथि सुविचार

जगतगुरू संतश्रेष्ठ
संत नामदेव महाराज
पुण्यतिथी निमित्त
🙏💐विनम्र अभिवादन💐🙏

संत नामदेव महाराज पुण्यतिथि sms 

नामदेव नाव मुखी हरिनाम
देव सुद्धा जेवी ज्याचे हातून
संतश्रेष्ठ नामदेव महाराज
यांना पुण्यतिथी निमित्त
💐🙏विनम्र अभिवादन🙏💐

संत नामदेव महाराज पुण्यतिथि स्टेटस

संत नामदेव महाराजांना
पुण्यतिथीनिमित्त…
💐🙏विनम्र अभिवादन🙏💐

संत नामदेव महाराज स्मृतीदिन संदेश

भक्तशिरोमणी
संत नामदेव महाराज
पुण्यतिथी निमित्त
💐🙏विनम्र अभिवादन🙏💐

संत नामदेव महाराज पुण्यतिथि शायरी 

अमृताहूनी गोड नाम तुझें देवा
मन माझे केशवा कां बा नेघे
श्री नामदेव महाराज
💐🙏पुण्यतिथी अभिवादन💐🙏

संत नामदेव महाराज पुण्यतिथि कोटस मराठी 

संत नामदेव महाराज
स्मृतिदिना निमित्त
💐🙏विनम्र अभिवादन🙏💐

संत नामदेव महाराज पुण्यतिथि मराठी फोटो

Sant Namdev Maharaj Punyatithi Photo In Marathi

संत नामदेव महाराज स्मृतीदिन विनम्र अभिवादन 

नामां म्हणे माझा विठ्ठल सापडला
तया काळ किळा पाड नाही
संत शिरोमणी नामदेव महाराज
💐🙏पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏💐

संत नामदेव महाराज पुण्यतिथि 

नामा म्हणे जीवें करीन लिंबलोण
ओवाळिन चरण विटेसहित
श्री नामदेव महाराज
💐🙏पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏💐

संत नामदेव महाराज पुण्यतिथि बॅनर मराठी 

Sant Namdev Maharaj Punyatithi In Marathi

Sant Namdev Maharaj Smrutidin Sms In Marathi

अपराधाच्या कोडी हीच माझी जोडी
पावनत्व प्रौढी नाम तुझें
श्री नामदेव महाराज
💐🙏पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏💐

Sant Namdev Maharaj Punyatithi Abhang In Marathi

अनाथासी साह्म होसी नारायणा ।
करुणावचना बोलविसी ॥१॥
पांडुरंगा कृपा करीं मजवरी ।
पामर उद्धरीं पाहतांची ॥२॥
गणिकें सत्वर मोक्षपद देसी ।
उपमन्यु बाळासी क्षीरसिंधु ॥३॥
नामा म्हणे याति विचारसी ।
कण्य घरीं खासी विदुराच्या ॥४॥

Sant Namdev Maharj Abhang In Text 

असोनि न दिसे लौकिक वेव्हरीं ।
ऐसा तूं अंतरीं लपवीं मज ॥१॥
परि तुझे पायीं माझें अनुसंधान ।
वरी प्रेमाजीवन देई देवा ॥२॥
मनाचिया वृत्ति आड तूं राहोनि ।
झेंपावती झणीं कामक्रोध ॥३॥
नामा म्हणे ऐसें पाळिसी तूं मातें ।
मी जीवें तूतें न विसंवें ॥४॥

Sant Namdev Maharaj Punyatithi Abhang Lyrics In Marathi

आतां माझी चिंता तुज नारायणा ।
रुक्मिणीरमणा वासुदेवा ॥१॥
द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं ।
धांव त्वां घेतली गजेंद्रासी ॥२॥
उपमन्या आळी तुवां पुरविली ।
अढळपदीं दिल्ही वस्ति धरुवा ॥३॥
नामा म्हणे करा करुणा केशवा ।
तूं माझा विसावा पांडूरंगा ॥४॥

Sant Namdev Maharaj Punyatithi Marathi Abhang

आतां होणार तें होवो पंढरीनाथा ।
न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥
ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम ।
हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥
आम्हीं तुझी देवा धरियेली कांस ।
न करी उदास पांडुरंगा ॥३॥
नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला ।
क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥

संत नामदेव महाराज पुण्यतिथि अभंग मराठी 

आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया ।
ऐसें हें कासया पाहसी देवा ॥१॥
जाणतां नेणतां नाम तुझें देवा ।
गाईन केशवा आवडीनें ॥२॥
विषयीं आसक्त भ्रांत माझें मन ।
कैसें तुझें भजन घडेल मज ॥३॥
नामा म्हणे आतां जाणसी तें करीं ।
पतितपावन हरि नाम तुझें ॥४॥

संत नामदेव महाराज अभंग मराठी मध्ये 

अगे तूं माउली संतांची साउली ।
आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥
प्रेमपान्हा पाजी अगे माझे आई ।
विठाई गे मायी वोरसोनी ॥२॥
येतों काकुळती प्रेम पान्ह्यासाठीं ।
उभा तो धुर्जटी मागें पुढें ॥३॥
नामा म्हणे जीवें करीन लिंबलोण ।
ओवाळिन चरण विटेसहित ॥४॥

संत नामदेव महाराज अभंग टेक्स्ट 

आशा तृष्णा व्याघ्र देखोनियां डोळा ।
जालेंसे व्याकुळ चित्त माझें ॥१॥
पावें गा विठोबा पावेंज गा विठोबा ।
पावें गा विठोबा मायबापा ॥२॥
तूं भक्तकैवारी कृपाळुवा हरि ।
येईं गा झडकरी देवराया ॥३॥
नामा म्हणे आन नाहीं तुजवांचोनि ।
जनक जननी केशिराजा ॥४॥

संत नामदेव महाराज अभंग मेसेज 

आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठीं ।
धांव जगजेठी स्वामी माझ्या ॥१॥
गेलासि केउता वाढिलें दुश्चिता ।
अगा कृपावंता स्वामी माझ्या ॥२॥
नामा म्हणे मज नाहीं कोण गत ।
तारिसी अनंत स्वामी माझ्या ॥३॥

संत नामदेव महाराज अभंग दाखवा 

आसनीं शयनीं आठवीं अनुदिनीं ।
नित्य समाधानीं रूप तुझें ॥१॥
काम धाम कांहीं नलगे माझ्या चित्तीं ।
न देखे विश्रांति तुजविण ॥२॥
तापत्रय ओणवा लागला चहूंकडे ।
न देखें उघडे तुजविण ॥३॥
तुजविण तें जिवलग दुजें कोण होईल ।
तें माझें निवारील उद्वेग हे ॥४॥
कृपेचा सागरू त्रिभुवनीं उदारू ।
न करी अव्हेरू अनाथाचा ॥५॥
नामा म्हणे केशवा आस माझी पुरवी ।
पाउलें दाखवी एक वेळां ॥६॥

संत नामदेव महाराज छोटे अभंग मराठी मध्ये 

आसनीं शयनीं भोजनीं गमनीं ।
तुझे पाय दोन्ही दावी मज ॥१॥
संसार कल्मष समूळ छेदिसी ।
दावीं अहर्निशीं पाय मज ॥२॥
हरी ध्यानीं मनीं भक्तां तूं परेशा ।
अनाथ कोंवसा गोंवळियां ॥३॥
नामा म्हणे नाम ऐकों सर्वोत्तमा ।
संसारींच्या श्रमा वारीं देवा ॥४॥

हे पण वाचा :

Q. श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथि कधी आहे?

Ans : श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथि ६ ऑगस्ट रोजी आहे.

Q. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे मूळ/पूर्ण नाव काय आहे ?

Ans : नामदेव दामाशेटी  रेळेकर  हे श्री संत संत शिरोमणी नामदेव महराज यांचे मूळ/पूर्ण नाव आहे.

Q. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे समाधीस्थळ/समाधी मंदीर  कोठे आहे?

Ans : पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे समाधीस्थळ/समाधी मंदिर  आहे

Q. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या आईचे नाव काय आहे ?

Ans : गोणाई दामाशेटी  रेळेकर

Q. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या वडिलांचे नाव काय आहे ?

Ans : दामा शेट्टी

Q. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे शिष्य कोण होते?

Ans: चोखामेळा

Q. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे गुरु कोण होते?

Ans : विसोखा खेचर

आम्हाला आशा आहे की संत नामदेव महाराज पुण्यतिथि संदेश, अभंग स्टेटस, इमेजेस, कोटस, फोटो इन मराठी | Sant Namdev Maharaj Punyatithi SMS, Abhang, Quotes, Status, Photo, Images Messages In Marathi For Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram ही पोस्ट आवडली असेल आवडले असतील तर आम्हाला कमेन्ट पोस्ट कशी वाटली हे नक्की कळवा धन्यवाद 

WhatsApp Group Join Group