माझी ताई मराठी निबंध | My Sister Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण माझी ताई निबंध लेखन |  Mazi Tai Nibandh In Marathi 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

My Sister Essay In Marathi / माझी ताई मराठी निबंध

My Sister Essay In Marathi

वर्णनात्मक निबंध – माझी ताई

[मुद्दे : ताई माझा आदर्श – विज्ञान शाखेत अकरावीत – डॉक्टर होण्याची महत्त्वाकांक्षा – आईच्या अनुपस्थितीत घर सांभाळणे – शाळेत सर्वांची आवडती- खूप मैत्रिणी.]

माझी ताई हा माझा आदर्श आहे. मी आता सहावीत आहे, तर ताई अकरावीत आहे. गेल्या वर्षी दहावीत तिने उत्तम गुण मिळवले. आता ती विज्ञान शाखेचा अभ्यास करत आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. मला खात्री आहे, ती उत्तम डॉक्टर होईल.

दुसऱ्यांची सेवा करणे तिला खूप आवडते. माझे आईबाबा दोघेही नोकरी करतात. त्यामुळे ताईला घरात खूप काम करावे लागते. ती घर व्यवस्थित ठेवते. आईबाबांना आलेले निरोप घेऊन ठेवते. ती माझ्याकडून अभ्यास करवून घेते. मला वेळच्या वेळी खाऊ घालते. ही सगळी कामे ताई न कंटाळता करते. कचेरीच्या कामासाठी काही वेळेला आईला बाहेरगावी जावे लागते, तेव्हा माझी ताईच सर्व घर सांभाळते.

ताई शाळेत सर्वांची लाडकी विद्यार्थिनी होती. शाळेच्या अनेक कार्यक्रमांत तीभाग घेत असे. शाळेच्या नियतकालिकात तिचा लेख असे. ताईला खूप मैत्रिणी आहेत. माझ्या ताईची मी लाडकी बहीण आहे.

माझी ताई मराठी निबंध व्हिडिओ

वरील निबंध हा खालील विषयांवर देखील लिहू शकता

  •  माझी ताई  निबंध मराठी / mazi tai  nibandh marathi
  • बहीण निबंध मराठी /  ajoba nibandh marathi
  • माझी बहीण  वर  निबंध / my sister essay in marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझी ताई मराठी निबंध | Majhi Tai Essay In Marathi कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

WhatsApp Group Join Group

Leave a Comment

x