रेल्वेस्थानक मराठी निबंध | Railway Station Essay In Marathi Best 100 Words

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये रेल्वेस्थानक मराठी निबंध / Railway Station Essay In Marathi 100 शब्दांमध्ये निबंध लेखन करणार आहोत

Railway Station Essay In Marathi

Railway Station Essay In Marathi

निबंध लेखन – रेल्वेस्थानक

[मुद्दे : स्थानकाचे नाव – स्थानकाची प्रसिद्धी – तेथील वातावरण – तेथे आढळणारे लोक – त्यांची वृत्ती – थेट गाड्यांच्या विभागातील दृश्य.]

मी खूप रेल्वेस्थानके पाहिली आहेत. पण मला मुंबईचे ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ हे रेल्वेस्थानक खूप आवडते. येथून ‘मध्य रेल्वे’च्या गाड्या सुटतात. या रेल्वेस्थानकाचे प्रमुख दोन विभाग आहेत.

एका विभागातून ‘स्थानिक’ म्हणजे लोकलगाड्या सुटतात; तर दुसऱ्या विभागातून दूरवर प्रवासाला जाणाऱ्या थेट गाड्यांची ये-जा चालू असते. दोन्ही विभागांतील दृश्ये अगदी भिन्न असतात. लोकल विभागातील गाड्यांची ये-जा काही मिनिटांच्या अंतराने होत असते. या गाड्यांतून दरवेळी हजारो माणसे ये-जा करत असतात. त्यामुळे खूप गर्दी असते. येथील प्रवासी नेहमी घाईत असतात.

थेट गाड्यांच्या विभागातील दृश्य वेगळे असते. येथून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या कमी असते. प्रवाशांकडे खूप सामान असते. हमाल घाईघाईने सामान वाहत असतात. विविध फेरीवाले आपल्या वस्तूंची विक्री करत फिरत असतात. प्रवाशांना निरोप दयायला आलेल्या नातेवाईकांची व मित्रांची तेथे गर्दी असते. येथील वातावरण खूप आनंदी असते.

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • रेल्वेस्थानक वर मराठी निबंध / Essay On Railway Station In Marathi
  • रेल्वेस्थानक निबंध मराठी दाखवा / Railway Sthanak Essay Dakhava In Marathi
  • मराठी निबंध रेल्वेस्थानक वर / Essay In Marathi On Railway Station

हे पण वाचा

तुम्हाला रेल्वेस्थानक मराठी निबंध लेखन | Railway Station Essay Writting In Marathi कसे वाटले हे कमेन्ट मध्ये नक्की कळवा धन्यवाद

WhatsApp Group Join Group