माकडांची शाळा मराठी निबंध | Makdanchi Shala Essay In Marathi In 100 Best Words

WhatsApp Group Join Group

आज या पोस्ट मध्ये आपण माकडांची शाळा मराठी निबंध / Makdanchi Shala Essay In Marathi 100 शब्दांमध्ये पाहणार आहोत

Makdanchi Shala Essay In Marathi

Makdanchi Shala Essay In Marathi

निबंध लेखन – माकडांची शाळा

[मुद्दे : माकडवाल्याचा खेळ – माकडांविषयी कुतूहल – कुठे शिकत असतील? – ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर माकडांविषयी कार्यक्रम – अनुकरण करत शिकणे – जंगल हीच त्यांची शाळा.]

मी शाळेतून घरी चाललो होतो. वाटेत माकडवाल्याचा खेळ दिसला. माकडवाला जसे सांगत होता, तसे ती दोन माकडे करत होती. माझ्या मनात आले की, माकडे कशी शिकत असतील? त्यांची शाळा कशी असेल?

एकदा मी दूरदर्शनवर ‘डिस्कव्हरी’ वाहिनी पाहत होतो. त्या वेळी माकडांवरील कार्यक्रम चालू होता. मी आनंदाने पाहू लागलो. माकडांची एक टोळीच असते. अगदी लहान पिले आईच्या पोटाशी बिलगूनअसतात. इतर पिले खेळत होती. पकडापकडी हा खेळ चालू होता. मध्येच काही पिले मारामारी करत होती. मारामारी वाढल्याबरोबर त्यांच्या आईने एकेकाच्या शेपटीला धरले आणि त्यांना दूर ढकलले.

एक पिलू झाडावर चढत होते आणि पडत होते. असे खूप वेळा झाले. अखेरीस ते झाडावर चढले. मग त्या पिलांची आई काहीतरी ओरडली. सगळी पिले आईकडे धावली. मग ती पिले आईसारखी कृती करू लागली. आई धावली की, ती धावत. आई थांबली की, ती थांबत. अशा त-हेने माकडे आपल्या टोळीतच शिकतात. तीच त्यांची शाळा आहे.

वरील मराठी निबंध खालील विषयांवर लिहू शकता

  • वानरांची शाळा मराठी निबंध / Monkey School Essay In Marathi
  • प्राण्यांची शाळा मराठी निबंध / Animals School Essay In Marathi
  • माकड यांची शाळा मराठी निबंध / Makad Yanchi Shala Marathi Nibandh

तुम्हाला माकडांची शाळा मराठी निबंध / Makdanchi Shala Marathi Nibandh कसा वाटला हे कमेन्ट मध्ये नक्की कळवा

तुमच्याकडे ही माकडांची शाळा मराठी निबंध विषयी काही मुद्दे असतील तर ते आम्हाला [email protected] वर मेल करा आम्ही तुमचे विचार या पोस्ट मध्ये अपडेट करू धन्यवाद

WhatsApp Group Join Group
x