माझी आई मराठी निबंध | My Mother Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझी आई  निबंध लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहोत. 

 

Mazi Aai Marathi Nibandh / माझी आई मराठी निबंध

my mother essay in marathi 100 words

 

 

निबंधलेखन 

वर्णनात्मक निबंध – माझी आई

[मुद्दे : प्रेमळ आई- सर्वांसाठी, घरासाठी कष्ट – सकाळी लवकर उठते- सर्वांचे जेवण तयार करते – आमची शाळेची तयारी- कामावरून घरी आल्यावरही घरकाम – स्वयंपाक करता करता आमचा अभ्यास स्वत: आनंदी राहून इतरांना आनंदी करते.]
        माझी आई खूप प्रेमळ आहे. ती आम्हां दोघांची म्हणजे माझी व माझ्या धाकट्या भावाची किती काळजी घेते! सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत ती सर्वांसाठी, घरासाठी सतत धडपडत असते!
         माझी आई दररोज सकाळी पाचला उठते; भराभर स्वयंपाक करते. आमचे शाळेत न्यायचे खाऊचे डबे तयार करते आणि मगच आम्हांला उठवते. आमची तयारी करायला आम्हांला ती मदत करते. आम्हांला न्याहरी करायला लावून शाळेत पाठवते. नंतर ती कामावर जाते.
        संध्याकाळी घरी आल्यावर आई प्रथम घर नीटनेटके करते. मग स्वयंपाकाला सुरुवात करते. स्वयंपाक करता करता ती आमचा अभ्यास घेते. आम्ही अभ्यास केला नाही, तर तिला खूप राग येतो. कधी कधी ती मारही देते. आमचे वाढदिवस ती दणक्यात साजरे करते. सगळे सणवार ती आनंदात साजरे करते. ती स्वत: आनंदी राहते आणि आम्हां सर्वांना आनंद देते. अशी ही माझी आई मला खूप खूप आवडते.
वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल 
  •  माझी आई निबंध मराठी / majhi aai nibandh marathi
  • आई निबंध मराठी /  aai nibandh marathi
  • माझी आई वर  निबंध / my mother  essay in marathi
मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझी आई मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद
WhatsApp Group Join Group
x