माझा महाविदयालयातील पहिला दिवस मराठी निबंध Majha Mahavidhyalayatil Pahila Divas Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये आपण माझा महाविदयालयातील पहिला दिवस मराठी निबंध / Majha Mahavidhyalayatil Pahila Divas Essay In Marathi 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत.

Majha Mahavidhyalayatil Pahila Divas Essay In Marathi

Majha Mahavidhyalayatil Pahila Divas Essay In Marathi

माझा महाविदयालयातील पहिला दिवस निबंध

[मुद्दे : महाविदयालयात अधीरतेने प्रवेश-भुरळ घालणारे वातावरण-वर्गाचे आनंददायी दर्शन-महाविदयालयात फेरफटका-प्राचार्यांचे स्वागतपर भाषण -अखेरीला घरी परत]

दहा वर्षे शिक्षण घेऊन आज अकरावीत जाताना छातीत धडधडत होते. कारण महाविदयालयातील भुरळ घालणारे नवीन वातावरण! त्या वातावरणात मी बुजले होते; पण तसे न दाखवता मी धिटाई दाखवत होते.

सूचना-फलकांपाशी विदयार्थ्यांनी खूप गर्दी केली होती. मुलांचे, मुलींचे गट इकडेतिकडे आनंदाने फिरत होते. काहीजण मुलींकडे बघत गमतीदार शेरे मारत होते. एकमेकांकडे पाहत, एकमेकांना टाळ्या देत. मोठमोठ्याने हसत गप्पाटप्पा चालू होत्या.

विविध प्रकारच्या पोशाखांचे तर संमेलनच भरले होते. काहीजण तर कोणाकोणावर ‘इंप्रेशन’ मारण्याच्या प्रयत्नात होते. मग त्या गर्दीत घुसून आम्हाला आमची तुकडी आणि वर्ग-खोली कोणती हे पाहावेच लागले.

गंमत म्हणून महाविदयालयात फेरफटका मारला. आमचा वर्ग पाहून मी खूश झाले. पंखे, दिवे, मोठा फळा, प्राध्यापकांसाठी छोटेसे व्यासपीठ होते. ती सारी व्यवस्था पाहून मला अतिशय आनंद झाला.

तेवढ्यात मला माझ्या शाळेतल्या दोन-तीन मैत्रिणी भेटल्या. मग आम्ही संपूर्ण महाविदयालय भटकलो. प्रयोगशाळा पाहून थक्क झालो. ती भव्य प्रयोगशाळा पाहून मला स्वत:लाच शास्त्रज्ञ बनल्यासारखे वाटले.

जिमखाना पाहून झाल्यावर आम्ही कॅन्टीनला भेट दिली. कॅन्टीनमधील ते उत्साही वातावरण पाहून मी हरखूनच गेले. पण सगळ्यांत माझ्या मनात  ठसले ते महाविदयालयातील ग्रंथालय! सगळे काही भव्य, भव्य होते.

महाविदयालयाच्या त्या दर्शनाने मी भारावूनच गेले. आपण उच्च वातावरणात शिरलो आहोत. उच्च पातळीवर पोहोचलो आहोत, असे मला वाटू लागले. आनंदाने व अभिमानाने माझे मन भरून गेले.

प्राचार्यांच्या स्वागतपर व्याख्यानाची वेळ झाली, म्हणून आम्ही घाईघाईने महाविदयालयाच्या सभागृहाकडे वळलो. तो हॉल गच्च भरला होता. ९० टक्के वा जास्त गुण मिळवणाऱ्या विदयार्थ्यांसाठी पहिल्याच रांगेत काही खुा राखून ठेवल्या होत्या.

प्राचार्य व प्राध्यापक आल्यावर सर्व सभागृह शांत झाले. अगदी मोजक्याच शब्दांत प्राचार्यांनी सर्व विदयार्थ्यांचे स्वागत केले आणि गोड शब्दांत विदयार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यांची व हक्कांची जाणीव करून दिली.

नंतर प्राचार्यांनी ९० टक्के व त्याहून अधिक गुण मिळालेल्या विदयार्थ्यांचा सत्कार केला. त्यांना पहिल्या वर्षाची सर्व पुस्तके बक्षीस म्हणून दिली गेली. कार्यक्रम संपल्यावर महाविदयालयाच्या मैदानातून मी मैत्रिणींबरोबर घरी निघाले. एक प्रकारच्या स्वप्निल वातावरणावर स्वार होऊन मी घरात शिरले.

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • शाळेतील पहिलं दिवस मराठी निबंध / Shaletil Pahila Divas Essay In Marathi
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध दाखवा / Maza Shaletil Pahila Divas Marathi Nibandh
  • माझा शाळेतील पहिला दिवस वर मराठी निबंध लेखन / Write Essay On First Day Of School In Marathi

हे निबंध सुद्धा वाचा

आम्हाला आशा आहे की माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध / Essay On Majha Shaletil Pahila Divas Essay In Marathi हे निबंध लेखन नक्कीच आवडले असेल. धन्यवाद,

WhatsApp Group Join Group

Comments are closed.