वाचनालय मराठी निबंध लेखन | Library Essay In Marathi Best 100 Words

या पोस्ट मध्ये वाचनालय मराठी निबंध लेखन / Library Essay In Marathi 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Library Essay In Marathi

Library Essay In Marathi

निबंध लेखन – वाचनालय

[मुद्दे : गावात देवालय असते, तसे वाचनालय आवश्यक वाढते – नको त्या गोष्टी टाळता येतात – ज्ञानाची कक्षा उंचावते – चांगला ग्रंथपाल लोकांच्यात वाचनाची आवड वाढवतो.]

गाव म्हटले की देवालय, अशी आपल्या वाडवडिलांची समजूत होती. त्याचप्रमाणे आज एकविसाव्या शतकात ‘गाव तेथे ग्रंथालय’, हे आता मान्य झाले आहे. काही गावांत शासनाच्या वतीने ग्रंथालये सुरू होतात, तर काही ठिकाणी सामाजिक संस्था पुढे येऊन वाचनालये सुरू करतात. वाचनालय हे गावाचे सांस्कृतिक केंद्र बनते.

गावात वाचनालय सुरू झाले की, गावातील लोकांना वाचनाची आवड निर्माण होते. आपला रिकामा वेळ गावकऱ्यांनी वाचनात घालवला पाहिजे. त्यामुळे अनेक रिकामटेकड्या, विध्वंसक गोष्टींना आळा बसतो. घरकामात गुंतलेल्या गृहिणी वेळात वेळ काढून वाचनालयात जातात आणि चांगली पुस्तके वाचतात. वाचनालयामुळे वाचकांची आणि ओघाने गावाची ज्ञानाची कक्षा उंचावत जाते.

वाचनालयाला चांगला ग्रंथपाल मिळणे हे अत्यंत आवश्यक असते. असा ग्रंथपाल वाचनालयात वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो आणि गावकऱ्यांना वाचनालयाकडे आकर्षित करतो. नव्या पुस्तकांचे परीक्षण, पुस्तकपरीक्षणाच्या स्पर्धा, कधी लेखकांच्या भेटीचा कार्यक्रम, कधी लहान मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात. मग गावाचे पाय वाचनालयाकडे वळतात.

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

  • ग्रंथालय हे देवालय मराठी निबंध लेखन / Library Essay in Marathi
  • वाचनालय मराठी निबंध दाखवा / Granthalay Marathi Nibandh Dakhva
  • ग्रंथालय विषयावर मराठी निबंध सांगा / Essay on Library In Marathi

हे पण वाचा

तुम्हाला ग्रंथालय मराठी निबंध लेखन / Library Essay In Marathi कसे वाटले कमेन्ट मध्ये नक्की कळवा धन्यवाद,

2 thoughts on “वाचनालय मराठी निबंध लेखन | Library Essay In Marathi Best 100 Words”

Leave a Comment