आदित्यराणूबाईची कहाणी मराठी | Kahani Aditya Ranubai Chi Vratkatha In Marathi

कहाणी हा लोकवाङ्मयाचा एक प्रकार आहे. (Aaditya Ranubai Chi Kahani Vratkatha Marathi pdf Download ) धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा म्हणजेच कहाणी ! व्रतवैकल्याच्या निमित्ताने सांगितली जाणारी गोष्ट ! श्रद्धेने आचरणात येणाऱ्या व्रताची फलनिष्पत्ती सांगणे हा काहणीचा उद्देश असतो. चातुर्मासात आचरणात आणावयाची जी जी व्रते व नियम आहेत, ती केव्हा, कशी व का घ्यावयाची, याचा खुलासा या कहाण्यांमधून होतो. काही कहाण्या देवदेवतांचे माहात्म्य सांगणाऱ्या आहेत.

या पोस्ट मध्ये आदित्यराणूबाईची कहाणी घेऊन आलो आहोत. ( Aaditya Ranubai Chi Kahani Vratkatha Marathi pdf Download )

कहाणी आदित्यराणूबाईची मराठी  | Kahani Aditya Rabubaichi In Marathi

पुढं दुसर्‍या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. “अग अग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या.” प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. ” बाबा, ठेवू नको. विसरू नको. जतन करून घरी घेऊन जा, ” म्हणून सांगितल. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. “दैवे दिलं, ते सर्व कर्मानं नेलं.”

पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासरखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊं माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनी भरून दिला. ” ठेवू नको, विसरू नको.” म्हणून सांगितलं, घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं. ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं.”

चवथ्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपान आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” “आई मावसशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं.”

पाचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घातलं माखूं घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. ” काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अंग अंग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं.” राजाच्या राणीनं विचारलं, “याला बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. “मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले.” “मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनीं आहेर केले. वाटेनं जाऊ लागलीं. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तो कहाणीची आठवण झाली. ” करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे.” असं म्हणून तो राणीकडे आला. तशी सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं. तीन आपल्या हातांत ठेवलीं. मनोभावें कहाणी सांगितली, चित्त भावें त्यान ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, “बाई बाई! कहाणी ऐकल्याचं एवढं फळं, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील,” उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही.” तेव्हां वसा सांगितला.

पुढं दुसर्‍या मजलेस गेली. स्वंयपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. ” करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याच शोध करा.” “उपाशी नाहीं, काही नाही” माळ्याचा मळा पिकत नाहीं, विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेन बसला आहे त्याला हाक मारली. ‘आमच्या बाईची कहाणी ऐक.” तो आला. राणीनं सहा मोत्ये घेऊन तीन आपण घेतलीं, तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, ” बाई बाई! कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा.” मग राणीनं त्याला वसा सांगितला. ( पौष रविवार कथा मराठी )

पुढं तिसर्‍या मजलेस गेली स्वंयपाक केला. राजाला वाढलं. मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. ” करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, काही नाहीं.” एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनांत गेला होता, एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, ” आमच्या बाईची कहाणी ऐकू.” ती म्हणाली, ” कहाणी ऐकून मी काय करूं? मी मुलांसाठी रडते आहें. बरं येते” मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला. डोहांत बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली,” बाई बाई! कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा.” मग राणीनं तिलाही वसा सांगितला. ( paush ravivar katha in marathi )

पुढं चौथ्या मजलेस गेलीं. स्वंयपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, काही नाहीं.” काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्ये होतीं. तीन मोत्ये त्याच्या बेंबीवर ठेवलीं, तीन मोत्ये आपण घेतलीं, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली; ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पांचव्या मुक्कामाला घरी आलीं. स्वंयपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोहघंगाळं पाणी तापवलं. पड्रस पक्कान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनाला बसले, त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, “अग अग, कोणाच्या पापणीचा केस आहे?” राजाच्या राणीला बारा वर्षं दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारीं वळचणीखालीं बसून केस विंचरले. “काळं चवाळं, डोईचा केंस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे.” राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये.

ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Kahani Aditya Ranubai Chi Vratkatha In Marathi | आदित्यराणूबाईची कथा मराठी pdf

Kahani Aditya Ranubai Chi Vratkatha In Marathi
Kahani Aditya Ranubai Chi Vratkatha In Marathi

आदित्य राणूबाई संपूर्ण कथा डाउनलोड pdf इन मराठी | Aaditya Ranubai Katha Pdf In Marathi

   Download PDf

आपण रविवार पौष महिना कथा मराठी pdf, आदित्यराणूबाईची कहाणी मराठी, आदित्यराणूबाईची कहाणी मराठी सांगा, Aaditya Ranubai kahani marathi, Aaditya Ranubaikahani pdf download free, आदित्यराणूबाईची व्रतकथा मराठी, व्रतकथा आदित्यराणूबाईची मराठी मध्ये  पाहिलेली आहे. तुम्ही वरील Download PDF बटणावर क्लिक करून आदित्यराणूबाईची कहाणी pdf डाउनलोड करू शकता. अशाच कहाणी वाचण्यासाठी marathispeaks.in वर भेट द्या, धन्यवाद

Leave a Comment

x