बेडूक माणसाचा मित्र मराठी निबंध | Beduk Mansacha Mitra Essay In Marathi 100 Words

WhatsApp Channel Follow Channel

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण बेडूक माणसाचा मित्र मराठी निबंध / Beduk Mansacha Mitra Essay In Marathi हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये  करणार आहे.

Beduk Mansacha Mitra Essay In Marathi

Beduk Mansacha Mitra Essay In Marathi

 

निबंधलेखन

वैचारिक निबंध – बेडूक माणसाचा मित्र

[मुद्दे : पावसाळ्याच्या दिवसांत बेडकांचे अस्तित्व जाणवते – जलचर, स्थलचर प्राणी – पाण्याची आवश्यकता – शेतातील जीवजंतूंचा शत्रू – पिकांचे रक्षण करणारा-पाणी शुद्ध करणारा माणसाचा मित्र.]

पावसाळ्याच्या सुमारास एक विचित्र आवाज कानावर पडतो, तो असतो डराँव डरॉव! आवाजाचा वेध घेतल्यावर एक ओंगळ प्राणी नजरेस पडतो. हा प्राणी दिसावयास विचित्र असला, तरी तो माणसांचा हितचिंतक आहे. हा प्राणी आहे बेडूक, बेडूक हा जलचर आणि स्थलचर असा प्राणी आहे.

काही बेडूक झाडावरही चढतात, बेडकांची कातडी कोरडी पडली तर बेडूक मरतात म्हणून त्यांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते. उन्हाळ्यात बेडूक ओलसर जमिनीत खूप खोल खणतात आणि तिथे जाऊन बसतात. काही किडे कीटक पिकांची नासाडी करतात.

बेडूक या किडे-कीटकांना खातात. उंदीर शेतातील पिकांचा फडशा पाडतात. पण शेतात बेडूक असले, तर ते उंदरांचाफडशा पाडतात. अशा प्रकारे बेडूक पिकांचे रक्षण करतात. विहिरीत घातक जीवजंतू असतात. बेडूक त्यांना खातात आणि पाणी शुद्ध करतात. असा हा बेडूक प्राचीन काळापासून माणसाचा मित्र आहे.

वरील निबंध हा खालील विषयांवर सुद्धा लिहू शकता

  • बेडूक माणसाचा मित्र निबंध मराठी / beduk mansacha mitra nibandh marathi
  • बेडूक वर मराठी निबंध  /frog nibandh marathi
  • माणसाचा मित्र बेडूक मोबाईल मराठी निबंध /  frog essay in marathi
मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा बेडूक माणसाचा मित्र वर मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद
WhatsApp Channel Follow Channel

2 thoughts on “बेडूक माणसाचा मित्र मराठी निबंध | Beduk Mansacha Mitra Essay In Marathi 100 Words”

Leave a Comment