२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | 26 January Speech In Marathi | Republic Day Speech In Marathi

WhatsApp Group Join Group

देशाने संविधानाचा (26 January Speech In Marathi) स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.

या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | Republic Day Speech In Marathi सांगणार आहोत. ते तुम्ही 26 जानेवारी च्या दिवशी भाषण माइक वर स्टेज वर बोलू शकता.

26 January Speech In Marathi

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | Prajasattak Din Bhashan Marathi

मी…( तुमचे नाव ) आदरणीय मान्यवर गुरुजन वर्ग आणि मला ऐकत असलेल्या श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी भाषण सांगणार आहे.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांचा युनियन जॅक दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून उतरला. भारताचा तिरंगा अगदी डौलानं, अभिमानानं फडकायला लागला. त्याचवेळी या देशातल्या बुद्धिजीवी, विद्वान लोकांनी एकत्र येऊन एका घटनेची निर्मिती केली. २६ जानेवारी १९५० रोजी या देशाला घटना अर्पण केली. या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद व अशा असंख्य व्यक्तींनी एकत्र येऊन ही घटना देशाला समर्पित केली.

स्वातंत्र्य, समता, न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था या मूलभूत विचारांवरती घटना देशाला अर्पण केलेली आहे. यामुळे हे राज्य प्रजासत्ताक म्हणून पाहिले जाते. प्रजेचे राज्य, रयतेचे राज्य अशी संकल्पना आपणास पाहावयास मिळते. देशामध्ये सर्व व्यक्तींना कोठेही राहण्याचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा त्याच पद्धतीने मुलभूत हक्कांचा, कर्तव्याचा, कार्याचा अधिकार प्रत्येक भारतीयास अर्पण करण्यात आला. घटना अर्पण करत असताना या देशामध्ये सर्व व्यक्तींना समान अधिकार प्राप्त झालेले आहेत. हा देश लोकशाहीचा स्वीकार करून लोकांचा विकास करणारा देश आहे.

हेच प्रजासत्ताक राष्ट्रांवरून आपणास पाहावयास मिळते. आपण सर्वांनी या गोष्टीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. समतेचे, स्वातंत्र्याचे, समानतेचे विचार आत्मसात करून लोकांना ते स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिन हा प्रजेच्या हक्काचे, कार्याचे, मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आपण या दिनाच्या निमित्ताने सर्वांनी प्रजेच्या कल्याणकारी गोष्टींची जाणीव करून त्याच दिशेने घटनेचा सन्मान करून वाटचाल करणे गरजेचे आहे.

आपण भारतीय या नात्याने प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाल्यानंतर त्या घटनेचा सन्मान करून आदरपूर्वक स्वीकार करून या राष्ट्रामध्ये राहणे हे तितकेच गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा आदर्श घेऊन घटनेचा सन्मान करून प्रजासत्ताक राष्ट्र घडवण्यासाठी २६ जानेवारी या दिनाच्या निमित्ताने प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन देश घडविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषणाला पूर्णविराम देतो.

जय हिंद जय भारत !


आम्हाला आशा आहे की प्रजासत्ताक दिन भाषण मराठी, prajasattak din bhashan marathi, भाषण मराठी, 26 january bhashan in marathi, 26 जानेवारी मराठी भाषण, 26 Jan bhashan marathi pdf, मराठी भाषण प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण मराठी ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद

WhatsApp Group Join Group