वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा मराठी निबंध | Vartaman Patre Taknara Mulga Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा मराठी निबंध / Vartaman Patre Taknara Mulga Essay In Marathi हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये  करणार आहे.

Vartaman Patre Taknara Mulga Essay In Marathi

Vartaman Patre Taknara Mulga Essay In Marathi

निबंधलेखन
वर्णनात्मक निबंध – वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा

[मुद्दे : रवी- गरीब विदयार्थी – घरची परिस्थिती कठीण – वर्तमानपत्रे टाकण्याचे काम – सकाळी लवकर उठावे लागते – अनेकांशी परिचय- त्यांची अभ्यासाला मदत संध्याकाळी काम – लेखक व्हायचे आहे.]

गेली दोन वर्षे रवी आमच्याकडे वर्तमानपत्रे टाकतो; पण त्याची व माझी फारशी ओळख झाली नव्हती. कारण तो जेव्हा त्याचे काम करून जातो, तेव्हा मी साखर झोपेत असतो. पण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो बिल घ्यायला येतो, तेव्हा बऱ्याच वेळा आमच्या गप्पा झाल्या आहेत.

रवी या वर्षी तेरावीत शिकत आहे. त्याला अभ्यास खूप आवडतो. घरच्या गरिबीमुळे गेली दोन वर्षे रवी सकाळी वर्तमानपत्रे टाकतो. त्याबद्दल त्याला दरमहा २०० रु. मिळतात. शिवाय संध्याकाळी तो एका पुस्तकाच्या दुकानात कामाला जातो. त्याबद्दल त्याला महिना ५०० रुपये मिळतात. संध्याकाळी दुकानात खूप गर्दी असते. पण त्याला पुस्तके खूप आवडत असल्याने, हे काम तो मनापासून करतो.

त्याला सकाळी लवकर उठावे लागते. या कामामुळे अनेक लोकांशी त्याचा परिचय होतो. त्यांतील काहीजण त्याला अभ्यासात मदत करतात. आपणही लेखक होऊन वर्तमानपत्रात लिहावे, पुस्तके लिहावीत, अशी त्याची महत्त्वाकांक्षा आहे.

वरील निबंध हा खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा निबंध मराठी / vartaman patre taknaara mulga nibandh marathi
  • बातमीपत्र देणारा मुलगा मराठी निबंध  /Newspaper vatnarya mulavar  nibandh marathi
  • न्यूज पेपर टाकणारा मुलगा मराठी निबंध /  vartaman patra var nibandh marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

WhatsApp Group Join Group