माझे गांव मराठी निबंध | aamche gaon essay in marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण आमचे गांव / माझे गाव  हे निबंध लेखन करणार आहे.

aamche gaon marathi nibandh / आमचे गांव मराठी निबंध

majhe gaon marathi nibandh 

 

निबंधलेखन 

वर्णनात्मक निबंध – माझे गाव / आमचे गांव

[मुद्दे : माझे गाव टुमदार खेडेगाव – बाराही महिने हिरवेगार – शेती हा मुख्य व्यवसाय मुख्य पिके व दुय्यम पिके – शाळा, देऊळ इत्यादी करमणुकीचे मार्ग- ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती इत्यादी.]
            कृष्णा नदीच्या काठावर एक टुमदार खेडेगाव आहे. साक्री हे त्याचे नाव. तेच माझे गाव आहे. कृष्णा नदीमुळे आमच्या गावाला बाराही महिने भरपूर पाणी मिळते. त्यामुळे हिरव्यागार वृक्षवेलींची झूल बाराही महिने आमच्या गावावर पसरलेली असते.
             माझ्या गावातील बहुसंख्य लोकांचा शेती हाच व्यवसाय आहे. जोंधळा हे येथील प्रमुख पीक आहे. काहीजण कडधान्ये व भात यांचेही पीक घेतात. काहीजणांनी फळा-फुलांचीही झाडे लावली आहेत.
             माझ्या गावात दहावीपर्यंतची शाळा आहे. एस्. एस्. सी. परीक्षेत दरवर्षी माझ्या शाळेचा खूप चांगला निकाल लागतो. गावाच्या मध्यभागी एक देऊळ आहे. देवळात गाभाऱ्यासमोर विस्तृत सभागृह आहे. या सभागृहात भजनाचे व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.
            माझ्या गावाने ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’चे पारितोषिक पटकावले आहे. माझे गाव आता पूर्णपणे व्यसनमुक्त झाले आहे. गावातील भांडणतंटेही गावकरी एकत्र बसून सोडवतात. आता माझे गाव तंटामुक्ती योजनेचे बक्षीसही नक्की मिळवणार आहे.
            असे हे माझे गाव मला खूप आवडते.
वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल 
  • माझे गांव  निबंध मराठी / majhe gaon nibandh marathi / my village marathi essay
  • आमचे गाव निबंध मराठी / aamche gaon nibandh marathi / village marathi essay 
  • गांव मराठी निबंध / gaon nibandh marathi / village marathi nibandh in marathi
मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा आमचे गाव  मराठी निबंध / my village essay in marathi कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

Leave a Comment

x