जंगलाचा राजा सिंह मराठी निबंध | Lion Essay In Marathi 100 Best Words

WhatsApp Group Join Group

आज आपण या पोस्ट मध्ये जंगलाचा राजा सिंह मराठी निबंध / Lion Essay In Marathi 100 शब्दांमध्ये पहाणार आहोत

Lion Essay In Marathi

Lion Essay In Marathi

निबंध लेखन – जंगलाचा राजा – सिंह

[मुद्दे : सिंह – जंगलाचा राजा – वर्ण – रूप – सवयी – संतापलेला सिंह माणसाचीही शिकार करतो – सिंहगर्जना – शूर, शक्तिशाली.]

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. त्याचा रुबाबही राजाला साजेसाच असतो. त्याचा रंग सोनेरी असतो. त्याचे डोके मोठे असते. त्या डोक्याभोवती मोठी आयाळ असते. त्याचे सुळे व त्याची नखे तीक्ष्ण व मजबूत असतात. त्याच्या पंजात खूप ताकद असते.

सिंह हा शूर प्राणी आहे. तो स्वत: शिकार करतो आणि तेच मांस तो खातो. इतरांनी केलेली शिकार वा मेलेला प्राणी सिंहाला आवडत नाही सिंहाचे राजेपण जंगलातील प्राणी मान्य करतात. तो जंगलात आनंदाने आणि अभिमानाने विहार करत असतो. संतापलेला सिंह फार भयंकर दिसतो. अशा वेळी तो माणसावरही हल्ला करतो आणि त्याला जखमी करतो किंवा ठारही करतो.

सिंहाच्या ओरडण्याला सिंहगर्जना म्हणतात. त्याच्या गर्जनेने सारे जंगल हादरून जाते. त्यामुळे सर्व प्राणी सिंहाला फार घाबरतात. लोकमान्य टिळकांनी आपल्या वृत्तपत्राचे नावसुद्धा ‘केसरी’ म्हणजे ‘सिंह’ असेच ठेवले होते. असा हा शूर, शक्तिशाली प्राणी सिंह कोणाला आवडणार नाही बरे!

वरील निबंध खालील विषयांवर लिहू शकता

  • सिंह मराठी निबंध / Lion Marathi Nibandh
  • जंगलाचा राजा मराठी निबंध / King Of Forest Essay In Marathi
  • सिंहावर मराठी निबंध / Lions Marathi Essay Writting

तुम्हाला जंगलाचा राजा सिंह मराठी निबंध / Janglacha Raja Essay In Marathi हा निबंध लेखन कसा वाटला हे कमेन्ट मध्ये नक्की कळवा धन्यवाद

WhatsApp Group Join Group