जर मला पंख असते तर मराठी निबंध | Jar Mala Pankha Aste Tar Essay In Marathi Best 100 Words

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये आपण जर मला पंख असते तर मराठी निबंध / Jar Mala Pankha Aste Tar Essay In Marathi 100 शब्दांमध्ये निबंध लेखन करणार आहोत.

Jar Mala Pankha Aste Tar Essay In Marathi

Jar Mala Pankha Aste Tar Essay In Marathi

निबंध लेखन – जर मला पंख असते तर…

[मुद्दे : पंखांची आवश्यकता काय? – उडण्यातील आनंद – निसर्गाशी हितगूज करणे – अविस्मरणीय दृश्ये – स्थळे पाहण्याची इच्छापूर्ती – घराचीआठवण.]

माझी ताई खूप दिवसांत आमच्याकडे आली नव्हती. मला तिची खूप खूप आठवण येत होती. तेव्हा मनात आले की, आपल्याला पंख असते, तर आपण उडत उडत ताईकडे गेलो असतो.

खरेच! मला उडता आले असते, तर किती मजा आली असती! पक्ष्यांप्रमाणे मस्तपैकी आकाशात उडत राहिलो असतो. उडता उडता दमलो असतो, तर एखादया झाडावर क्षणभर विसावलो असतो. झाडांशी, झाडांवरील पक्ष्यांशी खूप गप्पा मारल्या असत्या. मला पंख मिळाले तर मी खूप खूप प्रवास करीन. मला वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते.

प्रथम मी आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे पाहावयास सुरुवात करीन, मी महाराष्ट्रातील गड-किल्ले पाहून घेईन. महाराष्ट्रातील सर्व नदयांत पोहून घेईन, वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत घेईन. पण मी भटकत भटकत खूप दूर गेलो तर? तर आईबाबा खूप वाट पाहतील, आजी-आजोबा काळजी करतील, पण नकोच, मी खूप लांब जाणारच नाही! मात्र मला पंख हवेतच!

वरील निबंध खालील विषयांवर सुद्धा लिहू शकता

  • मला पंख असते तर मी काय केले असते मराठी निबंध / Mala Pankha Aste Tar Me Kay Kele Aste Essay in Marathi
  • जर मला पंख असते तर निबंध मराठी मध्ये दाखवा / Jar Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh 
  • मला पंख असल्यावर मराठी निबंध सांगा / Essay On Mala Pankha Aste Tar 

हे पण वाचा

तुम्हाला जर मला पंख असते तर निबंध लेखन मराठी मध्ये / Jar Mala Pankh Aste Tar Nibandh Lekhan Marathi Madhe कसे वाटले ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा

WhatsApp Group Join Group