VI Guarantee Offer: ही कंपनी देत आहे 130 जीबी डेटा, फक्त करावं लागेल हे छोटंसं काम

जर तुमच्याकडेही व्होडाफोन आयडिया उर्फ व्हीआयचे प्रीपेड सिम असेल तर कंपनी तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे. व्हीआय गॅरंटी प्रोग्रॅम अंतर्गत युजर्संना कंपनीकडून १३० जीबी हायस्पीड डेटा मोफत दिला जात आहे. या ऑफरचा फायदा कोणाला मिळणार आणि फ्री डेटा मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

आज आम्ही या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. ही व्हीआय ऑफर कंपनीने 4G आणि 5G युजर्ससाठी लाँच केली आहे, लक्षात घ्या ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठी आहे.

व्हीआय गॅरंटी ऑफर

व्होडाफोन आयडियाच्या या ऑफरअंतर्गत कंपनीच्या व्हीआय प्रीपेड युजर्सना एक वर्षाच्या कालावधीसह १३० जीबी फ्री डेटाचा लाभ मिळणार आहे. कंपनी दर २८ व्या दिवशी १३ वेळा प्रीपेड युजर्सच्या नंबरवर १० जीबी हायस्पीड डेटा क्रेडिट करेल.

व्ही ग्वारेंटी प्रोग्राम: फायदा कसा घ्यावा

एक्स्ट्रा डेटा ऑफरचा फायदा घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला 239 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या कोणत्याही प्लॅनने तुमचा नंबर रिचार्ज करावा लागेल.

आपल्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला डेटा संपल्यावरच तुम्ही हा अतिरिक्त डेटा वापरू शकाल. ही ऑफर फक्त अशा युजर्ससाठी आहे जे 5 जी स्मार्टफोन वापरतात किंवा नुकतेच नवीन 4G फोनमध्ये अपग्रेड झाले आहेत. अतिरिक्त डेटाचा लाभ घेण्यासाठी, पात्र वापरकर्त्यांना 121199 वर कॉल करावा लागेल किंवा तुम्ही *199*199# डायल देखील करू शकता.

VI Offer: या राज्यांना मिळणार नाही ऑफरचा लाभ

व्हीआय गॅरंटी ऑफरचा लाभ सर्व 4जी आणि 5 जी वापरकर्ते घेऊ शकतात, परंतु ही ऑफर सध्या मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये राहणाऱ्या यूजरस ला नाही मिळणार.

Leave a Comment