मित्र आणि मैत्रणींनो आज आपण वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध | Vatvrukshache Manogat Essay In Marathi हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहे.
Vatvrukshache Manogat Essay In Marathi
मुद्दे : वडाचे आत्मकथन सुरू – चैतन्य निर्माण करणारा – माणूस झाडाझुडपांच्या आश्रयाने राहणारा – वडाच्या सहवासाचे सुख – वडाचे स्वरूप – माणसाला होणारा उपयोग – मुलांना आनंद देणे – वडांची संख्या कमी कमी होत जाणे – वडाचे संरक्षण करण्याची
२४ सप्टेंबर २०१४. भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेत शिरले तो दिवस. माझ्याही अंगावर रोमांच फुलले होते. माझ्या डोळ्यांसमोर स्वप्न तरळू लागले. मला सुद्धा मंगळावर जायला मिळेल का? नेतील का मला? वा! किती रम्य कल्पना! ‘
मित्रांनो, मी वड बोलतोय. ‘वटवृक्ष’ असेही मला म्हणतात. मंगळावर जाण्याची मी इच्छा व्यक्त करतोय ना, ती मला मौजमजा करता यावी, परग्रह पर्यटनाचा आनंद लुटता यावा, म्हणून नाही. मंगळावर सध्या गवताचे एक पातेही आढळत नाही. मी तिथे गेलो तर सगळीकडे हिरवेगार जीवन निर्माण करीन. सर्वत्र चैतन्य फुलवीन. माणसाला उपयोगच होईल त्याचा. किंबहुना माणसाला त्याचीच गरज आहे. तुम्ही माणसाचा इतिहास पाहा. जिथे पाणी आहे आणि जिथे झाडेझुडपे वाढतात, तिथे माणसाने वस्ती केली आहे. आमच्याच आश्रयाने जीवन निर्माण होते, वाढते व फुलते. पाहा बरे, वाळवंटात किंवा दक्षिण ध्रुवाजवळ जीवन फुलले आहे का?
तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला पाहिले नसण्याची शक्यता आहे. शहरांमधून तर आम्ही जवळपास हद्दपारच होत चाललो आहोत. स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेत माणसाने झाडाझुडपांची कत्तल केली. आम्ही वड महाकाय वृक्ष. म्हणजे खूप जागा व्यापणारे. मग बिल्डर लोक आम्हांला जगू देतील का? तरीही बघा, आम्ही मंदिरांजवळ असतो समाधिस्थळांजवळ असतो. महामार्गावर काही पट्ट्यात फांदयांत फांदया अडकवून दुतर्फा उभे असतो. सावली निर्माण होते, डोळे निवतात, किती लोभसवाणे दृश्य असते ते! तेवढा प्रवास मी प्रसन्न करून टाकतो!
वटवाघळे, जवळजवळ प्रत्येक गावात माझा एक तरी भाऊबंद तुम्हांला आढळेल. तिथे जाऊन बघा. विविध पक्षी, खारी, माकडे वगैरे माझ्या अंगाखांदयावर बागडताना दिसतील. ते माझी फुले, फळे खाऊन जीव तृप्त करतात. येणाराजाणार वाटसरू माझ्या पारावर काही क्षण विसावल्याशिवाय पुढे जाणार नाही. सकाळी उठल्यापासून संसाराचे कष्ट उपसणाऱ्या सर्व गृहलक्ष्मी माझ्याच सावलीत दुपारी विसाव्याला येतात. निवडटिपण करता करता सुखदु:खाच्या गोष्टी बोलतात. अनेक जणींना अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग तिथेच सापडतो. म्हणून तर या सुवासिनी वटपौर्णिमेच्या दिवशी मला प्रदक्षिणा घालतात, माझी पूज करतात आणि माझ्याशी असलेले भावबंधन अधिक घट्ट करतात.
मित्रांनो, काही महाकाय वृक्षांपैकी मी एक आहे. माझे आयुष्यमानच मुळी शतकापेक्षा जास्त असते. तुम्हांला तीनशे-चारशे वर्षेसुद्धा जगलेले वड आढळतील. माझा उंची सर्वसाधारणपणे तीस मीटरएवढी असते. म्हणजे आठ-नऊ मजल्यांच्या इमारतीएवढी म्हणा ना! माझ्या फांदया जमिनीला समांतर वाढत जातात. त्यांना ठरावीक अंतरावर पारंब्या फुटतात. त्या जमिनीच्या दिशेने वाढत जातात. जमिनीत शिरतात आणि तिथे रुजतात. पारंब्यांमुळे फांदयांना आधार मिळतो. जीवनरस मिळतो. त्यांची जोमाने वाढ होते आणि माझा आकार विशाल बनतो.
मित्रांनो, माझ्या देहाचा वापर करून मी माणसाला किती गोष्टी दिल्या आहेत. तंबूचे खांब, बैलगाड्यांचे दांडे आणि जू, सजावटीचे सामान, सालींच्या धाग्यांपासून दोर वगैरे, किती गोष्टी सांगू? माझ्या चिकापासून चांगला गोंद तयार करतात. माझ्या पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करतात.
हे सगळे असो. पण, तुम्ही मुले माझ्या अंगाखांदयावर खेळता ना, त्याचे मला सर्वांत जास्त सुख मिळते. खेळ तरी कोणता? तर सूरपारंब्या. सूरपारंब्या म्हणजे पकडापकडीच. पण जमिनीवरची नव्हे. झाडावरची. या पारंबीवरून चढ. त्या पारंबीवरून उतर. या फांदीवर जा. त्या फांदीवर पळ. हा खेळ पाहताना माझा मीच हरखून जातो. अनेक पाय जमिनीत रोवून बसलेला मी स्वत:च पळतोय असे मला भासत राहते.
पण आम्ही आता अल्पसंख्य बनून नष्ट होण्याच्या मार्गावर आहोत. मुले आता माझ्याजवळ खेळायला येईनाशी झाली आहेत. माझे सुख हरवत चालले आहे. पण त्याहीपेक्षा ही मुले मोठ्या उल्हासाला पारखी होताहेत, याचे मला जास्त दुःख होते. तुम्ही माणसे कोणत्या सुखाच्या मागे कुठल्या दिशेने धावत आहात, हेच मला कळेनासे झाले आहे.
मी आता ठरवले आहे. सरकारला विनंती करायची की, मला ‘राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय वृक्ष’ म्हणून जाहीर करावे. त्यानिमित्ताने माझे संरक्षण होईल.
हे निबंध सुद्धा वाचा :
- असा रंगला सामना मराठी निबंध
- आमची मुंबई मराठी निबंध
- भूक नसतीच तर मराठी निबंध
- मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध
- थंड हवेचे ठिकाण मराठी निबंध
- पावसाची विविध रूपे मराठी निबंध
- चांदण्यातील सहल मराठी निबंध
- श्रावणातला पाऊस मराठी निबंध
वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता
- वट वृक्षाचे मनोगत मराठी निबंध / Vat Vrukshache Manogat Marathi Nibandh
- वटवृक्ष मराठी निबंध / Vat Vruksha Marathi Nibandh
- वडाच्या झाडाचे मनोगत निबंध मराठी / Vadachya Zadache Manogat Nibandh In Marathi
मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा वट वृक्षाचे मनोगत मराठी निबंध | Essay In Marathi On Vat Vrukshache Manogat कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद