या पोस्ट मध्ये आपण वाचाल तर वाचाल मराठी निबंध लेखन / Vachal Tar Vachal Essay In Marathi 100 शब्दांमध्ये करणार आहोत
Vachal Tar Vachal Essay In Marathi
निबंध लेखन – वाचाल तर वाचाल!
[मुद्दे : डॉ. आंबेडकरांनी केलेला उपदेश – अशिक्षित व्यक्ती स्वत:चे नुकसान करून घेते – इतर लोक त्यांना फसवतात – पिळवणूक होते – अंधश्रद्धा – शिक्षिताला कोणी फसवू शकत नाही- सुशिक्षित पालक आपल्या पाल्याची योग्य काळजी घेतात – जग पुढे चालले आहे.]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच दलित-पीडित, गरीब, अशिक्षित, दीनदुबळ्या जनतेला हा संदेश दिला होता- ‘वाचाल तर वाचाल!’ माणूस शिकला नाही; अशिक्षित राहिला की, त्याची सगळीकडून फसवणूक होते. जमीनदार, सावकार हे सगळे त्याची पिळवणूक करतात. तो सर्वांचा गुलाम होतो.
अशिक्षित माणूस चुकीच्या कल्पना मनात बाळगतो. त्याचे बाळ आजारी पडले, तर त्याला दृष्ट लागली, नजर लागली, असे तो मानतो. साप-विंचू चावला वा कुठली रोगराई आली, तर योग्य औषधोपचार न करता तो वैदू भगत, गंडा, दोरा असे उपाय करत राहतो.
शिकलेला माणूस आपली योग्य प्रगती करू शकतो. दुसरा कोणीही त्याची पिळवणूक करू शकत नाही, योग्य प्रकारे शिक्षण घेतलेल्या माणसाला योग्य वेतन क्यावे लागते. शिकलेले आईवडील आपल्या मुलांना कधीच अशिक्षित ठेवणार नाहीत. ते त्यांचे योग्य संगोपन करतात. आज सारे जग पुढे जात आहे. अशा वेळी आपण मागे राहून चालणार नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात की, वाचाल (शिक्षण घ्याल) तर वाचाल (टिकून राहाल)!
वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता
- वाचाल तर वाचाल निबंध मराठी दाखवा / Vachal Tar Vachal Marathi Nibandh
- वाचाल तर वाचाल निबंध मराठी मध्ये / Vachal Tar Vachal Nibandh In Marathi
- वाचाल तर वाचाल वर मराठी निबंध / Marathi Essay On Vachal Tar Vachal
तुम्हाला वाचाल तर वाचाल मराठी निबंध/Essay In Marathi On Vachal Tar Vachal कसा वाटला ते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा
तुमच्याकडे ही वाचाल तर वाचाल निबंध लेखनाचे विचार असतील तर contact@wordpress-1165811-4072179.cloudwaysapps.com या वर मेल करा आम्ही या पोस्ट मध्ये तुमच विचार अपडेट करू धन्यवाद