[PDF] श्रावण सोमवार व्रत कथा मराठी Pdf | Shravan Somvar Vrat Katha Marathi Free 1 Click Download

या पोस्ट मध्ये श्रावण महिना सोमवारची शिवामुठीची व्रत कथा / Shravan Mahina Somvarchi Shivamuthichi Vrat Katha तुम्हाला pdf मध्ये मराठी स्पीक्स मध्ये उपलब्ध करून दिली आहे ते तुम्ही येथे वाचू शकता आणि pdf File Download ही करू शकता (श्रावण सोमवार व्रत कथा Free pdf  Download)

Shravan Somvar Vrat Katha Marathi 

श्रावणी सोमवार व्रत कथा मराठी pdf डाउनलोड free

श्रावणी सोमवार व्रत कथा लिखित मराठी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या. एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी, नावडतीस जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं, रहावयाला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला. पहिला सोमवार आला. ती रानी गेली. कुठं नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई, जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं ? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ति होते, मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमचेबरोबर येते ! त्यांचेबरोबर देवळात गेली.

नागकन्या, देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली,काय गं बायांनो वसा वसता ? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो, त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पानं घ्यावी. मनोभावं पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा, महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरादेवा, सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा? असं म्हणून तांदूळ  व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टंमाष्टं खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसापाच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे. (Shravani Somvar Vrat Katha Pdf Download)

पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला. जावानणंदांनी उष्टंमाष्टं पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात आला, नावडतीनं घरातून ‘जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा, महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरदेवा, सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा! असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासूसासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाट कठीण आहे, काटेकुटे आहेत, साप, वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. (श्रावण सोमवार व्रत कथा मराठी)

पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव. म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या, झुंबर लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा, शिवा, महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरदेवा, सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला.

नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोट ठेवून तळ पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं, देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव, मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला, म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला. तसा तुम्हां होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संप्रूण (संपूर्ण).

Shravan Somvar Vrat Katha Pdf Download Link

shravan somvar vrat katha marathi pdf download link

हे पण वाचा :

वरील कहाणी शिवामुठीची सोमवारची ही कहाणी श्रावण सोमवार व्रत करताना वाचतात

( Related Search : श्रावणी सोमवार व्रत कथा दाखवा, श्रावण सोमवार व्रत कथा सांगा, श्रावण सोमवार व्रत कथा मराठी डाऊनलोड, Shravan Somvar Vrat Katha In Marathi Free Download, Shravani Somvar Vrat Katha In Marathi pdf download)

Leave a Comment

x