पंजाब डख यांचा नवा हवामान अंदाज आला, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंजाबराव डख यांनी दिली आहे.

काय म्हणाले पंजाब डख ? पंजाब डख यांनी त्यांचा हवामान अंदाज सांगितला आहे. पंजाब डख म्हणाले की, पाऊस निघून गेला आहे आणि राज्यात तीव्र थंडीला सुरुवात होणार आहे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. द्राक्ष शेतकऱ्यांसाठी आता घाबरायच कारण नाही, कारण आता पाऊस निघून गेला आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आज 27 पासून पुढील 10 दिवस हवामान कोरडे राहणार आहे त्यामुळे पाऊस येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीच चिंता करण्याचे कारण नाही.

ज्यांचे सोयाबीनचे शेत तयार झाले त्यांनी पेरणी केली तरी चालेल. तसेच हरभरा, गहू ची पेरणी करून घेतली तरी चालेल. हरभरा पेरणी करत असताना एक बाब शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत पेरलेल्या हरबऱ्याला उतारा येतो हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच 2 ते 3 नोव्हेंबर मध्ये थोडे ढगाळ वातावरण असेल परंतु पाऊस येणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या ओळया लागल्या आहेत त्यांनी सोयाबीन घरी आणा. कारण पाऊस येणार नाही सूर्यदर्शन कडक असणार आहे.

पंजाब डख हवामान अंदाज

 नवीन ताज्या बातम्या मिळवण्यासाठी व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा

Leave a Comment