पाखरांची शाळा निबंध मराठी | Pakhranchi Shala Essay In Marathi 100 Best Words

आज आपण या पोस्ट मध्ये पाखरांची शाळा मराठी निबंध / Pakhranchi Shala Essay In Marathi 100 शब्दांमध्ये पाहणार आहोत

Pakhranchi Shala Essay In Marathi 

निबंध लेखन – पाखरांची शाळा

[मुद्दे : पाखरांची शाळा- झाडावर, तारेवर – अनुकरणप्रियता – आई बाबा शिक्षक-खावे काय? -कसे? – स्वत:चे रक्षण कसे करावे? – उडावे कसे? -शिकता शिकता एक दिवस उड्डाण.]

पाखरांची शाळा भरे पिंपळावरती। चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती।। या कवितेच्या ओळी मी वाचल्या; तेव्हापासून पाखरांचीही शाळा असणार, असे मला वाटू लागले. आमच्या घराच्या समोर कसल्यातरी तारा आहेत. त्या तारांवर हे पक्षी अगदी रांगेत बसलेले असतात. क्षणात त्यातला एखादा भरारी मारतो. मग बाकीचे त्याचे अनुकरण करतात.

मला वाटते की अनुकरणातूनच ते शिकत असावेत. लहानशा घरट्यात त्यांचा जन्म होतो. त्यांचे आईबाबा त्यांना प्रथम भरवतात. किडा, कीटक असे भक्ष्य आणून त्यांच्या चोचीत देतात. मग हळूहळू ते आईबाबा पंख पसरून त्यांना उडायला शिकवतात. घरट्यातून जवळच्या फांदीवर, परत फांदीवरून घरट्यात अशी त्यांची तालीम चालू असते. ते चुकत चुकत शिकतात, हे अनेक वेळा मी पाहिले आहे.

एखादया वेळी आकाशात एखादी मोठी घार येते किंवा झाडाखाली बोका येतो. मग त्यांची आई त्यांना चटकन घरट्यात शिरायला शिकवते. असे शिकत शिकत ती मोठी होतात. हीच त्यांची शाळा आहे.

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • पाखरांची शाळा यावर मराठी निबंध / Bird School Essay In Marathi
  • पाखराची शाळा निबंध कसा लिहावा / Pakhranchi shala nibandh mrathi
  • पक्ष्यांची शाळा मराठी निबंध / Pakshyanchi Shala Marathi Essay

तुम्हाला वरील पक्ष्यांची शाळा मराठी निबंध / Essay In Marathi On Pakhranchi Shala दाखवा कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा धन्यवाद

Leave a Comment