‘अंक’ म्हणजे काय | दशअनंत | What Is a Number In Marathi

अंक म्हणजे काय | What Is Number In Marathi

what is number in marathi

१. अंक हे सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक

अतिप्राचीन भारतात गणितावर बरेच संशोधन झाले आहे. त्याविषयी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, प्राचीन काळातील भारतियांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना ‘अंक’ म्हटले जाते . हे अंक म्हणजे काय तर (१ ते ९ आणि ०) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहे. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.

२.  संकल्पना दशमान पद्धतीची

‘आसा’ या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतात रहाणार्‍या भारतीय गणिततज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकाच्या स्थानानुसार त्याची किंमत पालटेल, या ‘आसा’ यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा पद्धतीने लिहिलेले आकडे ‘हिंदासा’ नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः वर्ष ५०० मध्ये आर्यभट्टांनी दशमान पद्धती सगळीकडे रुजवली. त्यांनी शून्यासाठी ‘ख’ या शब्दाचा वापर केला. नंतर त्याला ‘शून्य’ असे संबोधले गेले.

३. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक ऐकण्यात येणे

इंग्रजीत संख्यांना सलग संज्ञा नाहीत. ‘थाऊजंड’, ‘मिलियन’, ‘बिलियन’, ‘ट्रिलियन’, ‘क्वाड्रिलियन’ अशा एक सहस्रांच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक अनेकदा ऐकिवात असतात, उदा. खर्व, निखर्व, पद्म, महापद्म अगदी परार्धापर्यंत. अर्थात आपण केवळ नावे ऐकून आहोत. त्यानुसार नेमकी संख्या सांगणे शक्य होत नाही; कारण त्याची आपल्याला सवयच नाही.

४. दशमान पध्दती माहिती

विविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीय दशमान पद्धतीनुसार खालीलप्रमाणे आकडे लिहिले जातात.

१ एक
१० दहा
१०० शंभर
१००० सहस्र
१०,००० दश सहस्र
१,००,००० लाख
१०,००,००० दहा लाख
१,००,००,००० कोटी
१०,००,००,००० दहा कोटी
१,००,००,००,००० अब्ज
१०,००,००,००,००० खर्व (दश अब्ज)
१,००,००,००,००,००० निखर्व
१०,००,००,००,००,००० पद्म
१,००,००,००,००,००,००० दशपद्म
१,००,००,००,००,००,००,०० नील
१०,००,००,००,००,००,००,०० दशनील
१०,००,००,००,००,००,००,००० शंख
१,००,००,००,००,००,००,००,००० दशशंख

५. एकावर शहाण्णव शून्य असणारी संख्या – दशअनंत !

आता यापुढील संख्या किती सांगता येईल का ? प्रयत्न करून पहा. एकावर शहाण्णव शून्य म्हणजे ही संख्या आहे दशअनंत; पण ही संख्या मोजायची कशी ? भारतीय पद्धतीत त्याचेही उत्तर आहे. अर्थात ते शब्द आता वापरात नाहीत. या शब्दांची सूची कोणत्याही पुस्तकात आता उपलब्ध नाही. काही जुन्या पुस्तकांत त्यांचे संदर्भ आहेत.

अशाच एका पुस्तकातील पुढील सूची पहा.

एकं (एक), दशं (दहा), शतम् (शंभर), सहस्र (हजार), दशसहस्र (दहा हजार), लक्ष (लाख), दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिती, दश क्षिती, क्षोभ, दशक्षोभ, ऋद्धी, दशऋद्धी, सिद्धी, दशसिद्धी, निधी, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रह्मांड, दशब्रह्मांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, वव, दशवव, शंकू, दशशंकू, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भार, दशभीर, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ,कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत.’

 हे पण वाचा

अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती

Leave a Comment