माझे आजोबा मराठी निबंध | My Grandfather Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझे आजोबा  निबंध लेखन Majhe Aajoba Marathi Nibandh 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

My Grandfather Essay In Marathi / माझे आजोबा मराठी निबंध

वर्णनात्मक निबंध – माझे आजोबा

[मुद्दे ; सत्तरीला पोहोचलेले वृद्ध – सेवानिवृत्त पण कार्यरत – स्वत:चा दिनक्रम आखलेला-या वयातही स्वावलंबी- मर्यादित आहार – सर्व विकारांवर तावा- सर्वांना साहाय्य करण्याची वृत्ती.]

‘आबा, काय करताय तुम्ही?’ हा प्रश्न दिवसातून दोन-चार वेळा आम्ही आमच्या आजोबांना विचारतो. आम्ही त्यांना ‘आबा’ म्हणतो. आमचे आबा आज सत्तरीला पोहोचले आहेत. ते नेहमी कशात ना कशात गुंतलेले असतात!

आबा आता सेवानिवृत्त आहेत, पण दैनंदिन कामांतून निवृत्त झालेले नाहीत. गोरेपान, काटक अशा आबांचे वागणे अगदी नियमित असते. सकाळी फिरून आले की, ते देवपूजा करतात. त्यांची सर्व कामे ते स्वत: करतात. मग माझ्या आईला विचारून ते बाजारपेठेत जातात; घरात लागणाऱ्या वस्तू घेऊन येतात. दुपारभर त्यांचे वाचन व दुरुस्तीची कामे चालू असतात.

घराची स्वच्छता करण्याचे काम त्यांना आवडते. कोणी अस्वच्छता केली किंवा वस्तू अस्ताव्यस्त ठेवल्या, तर ते चिडतात. बागेची निगाराखणी करणेही त्यांना आवडते. संध्याकाळी आबा त्यांच्या मित्रांच्या गप्पांमध्ये रंगलेले असतात.आमच्या अभ्यासातल्या अडचणी ते सहज सोडवतात. रात्री ते दूध व फळे घेतात आणि संगीत ऐकत झोपी जातात. सर्वांना मदत करण्यास ते सदैव पुढे असतात

वरील निबंध हा खालील विषयांवर देखील लिहू शकता

  •  माझे आजोबा निबंध मराठी / maze ajooba nibandh marathi
  • आजोबा निबंध मराठी /  ajoba nibandh marathi
  • आमचे आजोबा वर  निबंध / my grandfather essay in marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझे आजोबा मराठी निबंध | Majhe Ajoba Essay In Marathi कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

Leave a Comment