माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay In Marathi लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Majha Mitra Marathi Nibandh

My friend essay in marathi

 वर्णनात्मक निबंध – माझा मित्र

[मुद्दे : अनमोल मित्र – लहानपणापासून मैत्री – सुंदर हस्ताक्षर – अप्रतिम चित्रकला – मित्राच्या यशाने आनंदी होणारा – अबोल पण मनाने मोठा आवडता मित्र.]

अमोल हा माझा एक अनमोल मित्र आहे. अगदी बालपणापासून आमची दोस्ती. प्रथम आम्ही एकमेकांच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे दिवसातले बरेचसे तास आम्ही एकत्रच असायचो. आता आम्ही नवीन घर घेतले ते बरेच दूर आहे. पण शाळा, वर्ग, बाक हा माझा व अमोलचा एकच.

अमोलचे हस्ताक्षर व चित्रकला अप्रतिम आहे. त्यामुळे अमोलच्या वया फार सुंदर असतात. अमोल हुशार आहे. त्याला सर्व विषयांत चांगले गुण मिळतात. वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा यांत मात्र अमोल कधीच भाग घेत नाही; पण माझ्याप्रत्येक स्पर्धेला तो माझ्याबरोबर हजर असतो. माझ्या यशाचा त्याला खूप आनंद होतो.

अमोल अबोल आहे. म्हणून त्याला खूप कमी मित्र आहेत. मात्र तो मनाने फार मोठा आहे. म्हणून मला तो खूप आवडतो.

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल

  • माझा मित्र  निबंध मराठी / Maza mitra nibandh marathi
  • मित्र निबंध मराठी /  mitra nibandh marathi
  • मित्रा वर मराठी निबंध / essay on friend in marathi

हे निबंध नक्की वाचा

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझा मित्र मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

WhatsApp Group Join Group
x