मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझा आवडता खेळ निबंध / My Favourite Game Essay In Marathi लेखन 100 शब्दांमध्येकरणार आहोत.
Maza Aavdta Khel Marathi Nibandh
वर्णनात्मक निबंध – माझा आवडता खेळ
खो-खो हा माझा आवडता खेळ आहे. आमच्या घराजवळ एक मैदान आहे. आम्ही मित्र रोज तेथे खो-खो खेळतो. आम्ही एक संघ स्थापन केला आहे. ‘बालमित्र खो-खो संघ’ हे त्याचे नाव आहे. मी या संघाचा कर्णधार आहे.
खो-खो हा खेळ मैदानात खेळतात. हा खेळ खेळण्यासाठी कोणतेही साहित्य लागत नाही. त्यामुळे सर्व मुले हा खेळ खेळू शकतात. या खेळात दोन संघ असतात.प्रत्येक संघात नऊ खेळाडू असतात. एका संघातील खेळाडू बसतात. त्यांच्याभोवती दुसऱ्या संघातील खेळाडू पळत असतात. त्यांना बसलेल्या संघातील खेळाडू पकडतात. पकडलेला खेळाडू बाद होतो.
माझे काका आम्हांला खेळातील युक्त्या सांगतात. आम्हांला खूप सराव करायला लावतात. मी अनेक खेळाडूंना पटापट बाद करतो. मला मात्र कोणी पटकन बाद करू शकत नाही. त्यामुळे आमचा संघ नेहमी जिंकतो. मी मोठा झालो की, महान खो-खोपटू होणार!
वरील निबंध हा खालील विषयांवर देखील लिहू शकता
- माझा आवडता खेळ निबंध मराठी / maza avadta khel kho kho essay in marath
- खो-खो खेळ निबंध मराठी / favorite play kho-kho nibandh marathi
- खेळांवर वर निबंध / my favourite game essay in marathi
मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझा आवडता खेळ मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद
Khupch mst mla khup avdla
Thank you mla ya nibandhatun kahi hints milalya mhnun 😇😀🙂🥰
Welcome😇
Very Good Essay
Thank You😇
WOW ! Khup chan ahai niband
Mala khup chan vatla
🙏🙏🙏