माझा आवडता पक्षी मराठी निबंध | My Favorite Bird Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझा आवडता पक्षी निबंध लेखन | Maza Aavdta Pakshi Nibandh In Marathi 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

My Favorite Bird Essay In Marathi / माझा आवडता पक्षी  मराठी निबंध

My Favorite Bird Essay In Marathi

वर्णनात्मक निबंध – माझा आवडता पक्षी

[मुद्दे : पोपट हा पक्षी लहानपणापासूनचा मित्र-घरातील एक सभासद- त्याचे आवडते पदार्थ- त्याचे गुण – सवयी- दिलेले प्रेम. ]

माझा बालपणापासूनचा मित्र – म्हणजे माझा हिरवा मित्र! म्हणजे पोपट! आमच्या घरी बऱ्याच वर्षापासून पोपट सांभाळलेला आहे. स्वत:च्या पिंजऱ्यातील दांडीवर बसून तो सर्वांना हाका मारतो. घरातील सर्व माणसेही येता-जाता त्याला ‘राघू म्हणून साद घालतात.

पोपटाचा हिरवा रंग व लाल चोच मला फार आवडते. आमचा राघू प्रेमळ आहे. त्याच्या पिंजऱ्यात हात घातला, तरी तो इजा करत नाही. मी त्याला पेरूची फोड किंवा लाल मिरची देतो. तो ती अलगद उचलतो. राघूला आजोबांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ असे म्हणायला शिकवले आहे. त्यामुळे तो कोणाचेही स्वागत ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणूनच करतो.

आमच्या घरात राघू कित्येक वेळा मोकळा फिरत असतो. घरातील कोणाच्याही खांदयावर तो बसतो. त्याला दिलेली ओली डाळ तो आवडीने खातो आणि मनात आले की, आपणच स्वत: पिंजऱ्यात जाऊन बसतो. रात्री मात्र आम्ही त्याचा पिंजरा आठवणीने बंद करतो.

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल

  • माझा आवडता पक्षी निबंध मराठी / maza aavdta pakshi nibandh marathi
  • पक्षी निबंध मराठी / favorite bird parrot nibandh marathi
  • पोपट माझा आवडता पक्षी वर  निबंध / my favourite birdessay in marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझा आवडता पक्षी निबंध मराठी | Essay On Marathi My Favourite Bird निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

Leave a Comment