माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay In Marathi

WhatsApp Channel Follow Channel

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझे बाबा निबंध लेखन | My Father Nibandh In Marathi 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Maze Baba Marathi Nibandh / माझे बाबा मराठी निबंध

my father essay in marathi
बाबां मराठी निबंध लेखन 

निबंधलेखन
वर्णनात्मक निबंध – माझे बाबा

[मुद्दे : मी बाबांचा लाडका मुलगा – माझी काळजी घेणे – अभ्यासाकडे बारीक लक्ष – गोष्टींची पुस्तके आणणे – न्याहरीनंतर साफसफाई-घरकामात मदत- चांगली नाटके व चित्रपट पाहायला नेणे – वाढदिवस आनंदात साजरा करणे-न रागावणे-प्रेमळ.]

मला माझे बाबा खूप खूप आवडतात. मीसुद्धा त्यांचा लाडका मुलगा आहे. ते माझी खूप काळजी घेतात. माझ्या अभ्यासाकडे त्यांचे बारीक लक्ष असते. ते रोज माझ्या वया तपासतात. मला काही अडले असेल, तर समजावून सांगतात. त्यांच्यामुळे माझा अभ्यास नियमितपणे होतो.

सकाळी चहा घेतला की, ते प्रथम वर्तमानपत्र वाचतात. मग खुा टेबले पुसून स्वच्छ करतात. कपड्यांच्या घड्या करून ठेवतात. सर्व वस्तू जागच्या जागी ठेवतात. आईलाही कामात मदत करतात. माझे बाबा मला सुट्टीच्या दिवशी फिरायला नेतात. कधी कधी नाटक दाखवतात; चित्रपट पाहायला नेतात. माझा वाढदिवस ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ते माझ्यासाठी नेहमी गोष्टींची पुस्तके आणतात.

माझे बाबा खूप प्रेमळ आहेत. त्यांनी मला कधीच मारले नाही. ते कधी रागावत नाहीत. नेहमी शांतपणे
समजावून सांगतात. म्हणून माझे बाबा मला खूप आवडतात

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल

  •  माझे बाबा निबंध मराठी / majhe baba nibandh marathi
  • वडील निबंध मराठी /  vadil nibandh marathi
  • माझे वडील वर  निबंध / my father essay in marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझे बाबा मराठी निबंध | Marathi Essay On My Father कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment