माझी अविस्मरणीय सहल मराठी निबंध | Mazi Avismarniy Sahal Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये आपण माझी अविस्मरणीय सहल मराठी निबंध Mazi Avismarniy Sahal Essay In Marathi 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत.

Mazi Avismarniy Sahal Essay In Marathi

Mazi Avismarniy Sahal Essay In Marathi

माझी अविस्मरणीय सहल किंवा

[ मुद्दे : सहलीच्या ठिकाणाची निवड सहलीची तयारी -सहलीच्या ठिकाणाचे प्रथमदर्शन पर्वत-शिखरावरील ढग, हिरवीगार वनराई यांचा अनुभव स्वच्छतेचा प्रसन्न अनुभव तेथील लोकांविषयी सद्भाव ]

मला मागील सुट्टीत आमच्या घरी जेव्हा सहलीचा बेत सुरू झाला तेव्हा सर्वांत जास्त आनंद कोणाला झाला असेल, तर तो मलाच! आईबाबांनी तिरुपती, चेन्नई, मदुराई, कोडाईकॅनॉल व कन्याकुमारी ही ठिकाणे निश्चित केल्यावर तर माझा उत्साह उतू जाऊ लागला.

कारण आमच्या महाविदयालयातल्या प्रकल्पासाठी म्हणून या ठिकाणांच्या माहितीची कितीतरी कात्रणे मी जमवली होती. ती कात्रणे वाचताना, आपल्याला ही ठिकाणे पाहायला मिळावीत, असे अनेकदा तीव्रतेने वाटून गेले होते.

आता ही ठिकाणे आपल्याला पाहायला मिळणार म्हटल्यावर मला खूपच आनंद झाला. मी ती कात्रणे पुन:पुन्हा वाचून काढली आणि तितक्या वेळा मी कल्पनेने दक्षिण भारताची सहल केलीसुद्धा ! पण येथे एक कबूल केले पाहिजे की, दक्षिण भारताचे प्रत्यक्ष दर्शन मात्र कल्पनेपेक्षाही मोहक होते!

आम्ही मुंबईहून निघालो ते पहिल्यांदा तिरुपतीला गेलो. तिरुपती बालाजी हे दक्षिणेतील जागृत देवस्थान आहे, असे म्हणतात. या ठिकाणी श्रद्धा आणि सौंदर्य यांचा सुरेख संगम आढळतो. तिरुपतीला गेलो तेव्हा आणखी आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले.

बसमधून उतरतो तो छोट्या मुलींपासून म्हाताऱ्या बायकांपर्यंत रेशमी, भडक रंगाच्या साड्या नेसलेल्या आणि अंगावर हिऱ्यांचे लखलखते दागिने घातलेल्या; पण वर डोके  तुळतुळीत केलेल्या स्त्रिया आम्हांला दिसल्या.

प्रथमदर्शनी हे दृश्य पाहून आम्ही स्तिमितच झालो! पण नंतर कळले की, तिरुपती बालाजीला नवस बोलल्यामुळे या स्त्रियांनी सौंदर्यलेणे असलेले आपले लांबसडक काळेभोर केस देवाला अर्पण केले होते.

त्यांची ही श्रद्धा आणि त्या श्रद्धेमागील अंधश्रद्धा पाहून हसू कुठल्या कुठे पळाले आणि डोके सुन्न झाले. कोडाईकॅनॉल हे दक्षिणेकडील आठ हजार फूट उंचीवर असलेले रम्य ठिकाण आहे.

तिथे जाताना जेव्हा आम्ही बसमधून चढण चढू लागलो, तेव्हा आम्हांला ढग तरंगत जाताना दिसले. आणखी उंचावर गेल्यावर दुरून दिसणारा डोंगरांचा हिरवा रंग अधिकच गडद झाला. निरनिराळ्या रंगांची, आकारांची अपरिचित फुले दिसू लागली.

अखेर मुख्य ठिकाण आले. आम्ही बसमधून जमिनीवर उतरलो की ढगातच उतरलो, हेच कळत नव्हते. सर्व प्रवासात लक्षात राहिली, ती तेथील स्वच्छता. रस्ते, बागा, मंदिरे,  हॉटेल कुठेही बघा, कागदाचा कपटासुद्धा पडलेला दिसायचा नाही.

आणि माणसे! प्रात:काळी उठून, स्वच्छ अंघोळ करून, अंगावर भस्माचे पट्टे ओढून प्रसन्न चेहऱ्याने लखलखीत कपड्यांत कामावर हजर होतात. तिथल्या देवळांमध्ये विजेचे दिवे आढळत नाहीत.

गाभाऱ्यात मंद समया तेवत असतात. दर्शनाला पाय धुऊनच आत जावे लागते. दाक्षिणात्य देवळांतील ही स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. दक्षिणेकडील लोकांबद्दल माझ्या मनात थोडा नकारात्मक भाव पूर्वी होता.

या प्रवासात हा नकारात्मक भाव नाहीसा ला आणि तेथील लोकांबद्दल आपुलकी निर्माण झाली. आपला भारत किती छान आहे, याची पुरेपूर प्रचीती आली.

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • माझी अविस्मरणीय सहल मराठी निबंध / Majhi Avismaraniya Sahal Essay Marathi
  • माझी सहल मराठी निबंध लेखन / Essay On Majhi Sahal In Marathi
  • सहल मराठी निबंध / Scholl Trip Marathi Nibandh

हे सुद्धा वाचा

आम्हाला आशा आहे की माझी अविस्मरणीय सहल मराठी निबंध / Essay on Mazi Avismarniya Sahal In Marathi हे निबंध लेखन नक्कीच आवडले असेल धन्यवाद,

WhatsApp Group Join Group

Comments are closed.