माझा महाराष्ट्र मराठी निबंध | Majha Maharashtra Essay In Marathi

नमस्कार, या लेखामध्ये आम्ही माझा महाराष्ट्र निबंध मराठी 100 शब्दांमध्ये दिलेले आहे. हा निबंध पहिली ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी लिहू शकतात

Majha Maharashtra Essay In Marathi / माझा महाराष्ट्र मराठी निबंध

वर्णनात्मक निबंध – माझा महाराष्ट्र

[मुद्दे: महाराष्ट्राबद्दल अभिमान – समृद्ध भूमी, नदया, पर्वतरांगा अन्नधान्ये, फळेफुले यांनी समृद्ध – उदयोगांत आघाडीवर – वीरांचा, संतांचा देश- स्वराज्याचा पाया नररत्नांची खाण – साहित्य-कला क्षेत्रांत अग्रेसर – खूप खूप प्रिय.]

माझ्या महाराष्ट्राने अनेक क्षेत्रांत माझ्या भारताची गौरवपताका फडकवली आहे. म्हणूनच, मी महाराष्ट्रीय आहे, याचा मला अभिमान वाटतो.

माझ्या महाराष्ट्राला समृद्ध भूमी लाभली आहे. कृष्णा, कोयना, गोदावरी यांसारख्या अनेक नदया महाराष्ट्रात आहेत. पश्चिमेला सह्याद्री पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. इथल्या माणसांची मने या सह्याद्रीसारखीच भक्कम आहेत. इथले लोक कष्टाळू आहेत. त्यांनी महाराष्ट्राला समृद्ध केले आहे. आज महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे, फुलाफळांनी समृद्ध आहे. आज संपूर्ण भारतात महाराष्ट्र उदयोगांच्या बाबतीत आघाडीवर आहे.

महाराष्ट्राला वीरांची व संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीच या महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याचे तोरण बांधले. बलाढ्य इंग्रजांना हादरवणारे लोकमान्य टिळक या भूमीतच जन्मले. महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. साहित्य व कला या क्षेत्रांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती भारताची आर्थिक राजधानी आहे. असा हा महाराष्ट्र मला खूप खूप प्रिय आहे.

वरील निबंध हा खालील विषयांनावर सुद्धा लिहू शकता

  • माझा महाराष्ट्र  निबंध मराठी / majha maharashtra nibandh marathi
  • आमचा महाराष्ट्र निबंध मराठी / aamcha maharashtra nibandh marathi
  • महाराष्ट्र मराठी निबंध / maharashtra nibandh marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझा महाराष्ट्र मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

Leave a Comment