नवीन मराठी कोडे व त्याचे उत्तर | New Marathi kode With Answers Puzzles

WhatsApp Group Join Group
या पोस्ट मध्ये नवीन मराठी कोडी व त्यांची उत्तरे, New Marathi Kode With Answers बघणार आहोत
 

मराठी कोडे व उत्तर | Navin Marathi Kode With Answer

 
कोडे 1) मुकूट याच्या डोक्यावर,
जांभळा­ झगा अंगावर 🤔
उत्तर : वांग
 
कोडे 2) एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव ! दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव
सांगा पाहु ते नाव काय?🤔
उत्तर : सीताराम
 

मराठी कोडी दाखवा

 
कोडे 3) कोडेप्रश्न असा आहे कि उत्तर काय?🤔
उत्तर : दिशा
 
कोडे 4) पुरूष असून पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो🤔
उत्तर : कंडक्टर/ बस वाहक
 

मराठी कोडे व त्याचे उत्तर / Marathi kode with answers in marathi

 
कोडे 5) पाणी नाही, पाऊस नाही, 
तरी रान कसं हिरवं ,
कात नाही,चुना नाही, 
तरी तोंड कसं रंगल🤔
उत्तर: पोपट
 
कोडे 6) पाटिल बुवा राम राम, दाढी मिशालांब लांब 🤔
उत्तर: कणीस
 

मराठी कोडे सोडवा

 
कोडे 7) पांढरं पातेल पिवळा भात 🤔
उत्तर: अंड
 
कोडे 8) दोन भाउ शेजारी, भेट नाही जन्मान्तरी 🤔
उत्तर: डोळे
 

मराठी कोडे आणि उत्तरे

 
कोडे 9) थई थकड धा.. 
तीन डोकी पाय धा 🤔
उत्तर: दोन बैल, नांगर आणि एक माणूस (शेत नांगरणारा)
 
कोडे 10) तीनजण वाढायला बाराजण जेवायला 🤔
उत्तर: घड्याळ
 

मराठी कोडे आणि उत्तर

 
कोडे 11) तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई 🤔
उत्तर: चूल आणि तवा 
 
कोडे 12) तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला 🤔
उत्तर: लवंग
 

मराठी कोडे सांगा | Riddles In Marathi 

 
कोडे 13) लाल आहे पण रंग नाही, 
कृष्ण आहे पण देव नाही, 
आड आहेपण पाणी नाही, 
वाणी आहे पण दुकान नाही 🤔
उत्तर: लालकृष्ण आडवाणी
 
कोडे 14) सगळे गेले रानात,अन् झिपरी पोरगी घरात 🤔
उत्तर: केरसुणी
 

नवीन मराठी कोडी

 
कोडे 15) सुपभर लाह्या त्यात एक रुपया🤔
उत्तर: चंद्र आणि चांदण्या
 
कोडे 16) सोन्याची सुरी
भुईत पुरी,
वर पटकार गमजा करी 🤔
उत्तर: गाजर
 

marathi kode with answers

 
कोडे 17) हजार येती हजार जाती 
हजार बसती पारावर,
अशी नारती जोराची हजार घेती ऊरावर 🤔
उत्तर: बस /ट्रेन.
 
कोडे 18) हिरवी पेटी काट्यात पडली,उघडूनपाहिली तर मोत्याने भरली 🤔
उत्तर: भेंडी
 

marathi kode funny with answer

 
कोडे 19) चार खंडांचा एक शहर,
चार विहीरी  बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी 
आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!!🤔
उत्तर: कॅरम बोर्ड गेम
 
कोडे 20)  कोकणातनं आली सखी,
तिच्या मानंवर दिली बुक्की ,
तिच्या घरभरलेकी
उत्तर: लसूण🤔
 

marathi kode sodva

 
कोडे 21) कोकणातनं आली नार,
तिचा पदर हिरवागार,
तिच्या­ काखेला प्वार🤔
उत्तर: काजू (फळासकट)
 
कोडे 22) कोकणातनं आला रंगूकोळी,
त्यानं आणली भिंगू चोळी,
शिंपीण म्हणते शिवू कशी,
परटीण म्हणते धुवू कशी,
अन् राणी म्हणते घालू कशी 🤔
उत्तर: कागद
 

marathi kode new

 
कोडे 23) कोकणातनं आला भट ,
धर की आपट 🤔
उत्तर: नारळ
 
कोडे 24) कुट कुट काडी पोटात नाडी,
राम जन्मला हातजोडी 
कृष्ण जन्मला हात जोडी🤔
उत्तर: देवर्‍यातील घण्टी / टाळ.
 

marathi kode paheli

 
कोडे 25) काळ्या रानात हत्ती मेला 
त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला🤔
उत्तर: कापुस
 
कोडे 26) काट्याकुट्या­चा बांधला भारा,
कुठं जातोस ढबुण्या पोरा 🤔
उत्तर: फणस
 

मराठी कोडी व उत्तरे

 
कोडे 27) कांड्यावर कांडी
सात कांडी,
वरसमुद्राची अंडी 🤔
उत्तर: ज्वारीचे कणीस
 
कोडे 28) एवढीशी नन्नुबाय,
साऱ्या वाटणं गीत गाय 🤔
उत्तर: शिट्टी
 

मराठी कोडी whatsapp

 
कोडे 29) एवढस कार्टं
घर कसं राखतं 🤔
उत्तर: कुलूप
 
कोडे 30) इथेच आहे पण दिसत नाही 🤔
उत्तर: वारा
 

कोडे सोडवा मराठी

 
कोडे 31) आहे मला मुख,परंतु खात नाही,
दिसते मी झोपलेली,पण असते पळतही,
माझ्याशिवाय तुमचे,जगणेच शक्य नाही
वहा तुम्ही माझी,थोडीशी कळजीही, 
मी कोण काढा शोधुन,नाहीतर बें म्हणा मागून 🤔
उत्तर: नदी
 
कोडे 32) आटंगण पटंगण 
लाल लाल रान,
अन् बत्तीस पिंपळांना 
एकच पान 
उत्तर: तोंड(दात आणि जीभ)
 
 
या पोस्ट मध्ये मराठी कोडी व त्यांची उत्तरे,मराठी कोडी नवीन,मराठी कोडी लेखी,मराठी कोडे आणि उत्तर, Marathi Puzzles With Answers in Marathi, Marathi Kode in Marathi, Kode in Marathi, Latest New Kode in Marathi, Marathi News Kode In Text, Marathi Navin Kode Download, New Kode SMS, New Marathi Kode Message हे बघितले आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना हे कोडे शेयर करा 
 
आणि तुमच्या कडे असेच नवीन कोडे असतील तर कमेन्ट करा आम्ही ह्या पोस्ट मध्ये अपडेट करू धन्यवाद, 
WhatsApp Group Join Group

Comments are closed.

x