माझ्या हातून झालेली चूक मराठी निबंध | Majhya hatun jhaleli chuk Marathi Nibandh 

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझ्या हातातून झालेली चूक निबंध | Mazya Hatatun Zaleli Chuk Essay In Marathi लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Majhya hatun jhaleli chuk Marathi Nibandh

माझ्या हातातून झालेली चूक मराठी निबंध

निबंधलेखन
कल्पनात्मक निबंध – माझ्या हातून झालेली चूक

[मुद्दे : चुकीची आठवण होणे – गेल्या वर्षीची सहामाही परीक्षा – परीक्षेत कॉपी – त्या विषयात सर्वात जास्त गुण – आईला सत्य सांगणे – आईचे मार्गदर्शन – बाईंना पत्र – बाईनी शाबासकी देणे.]

खरे तर मी एक चांगला विदयार्थी आहे. चुकीचे वागणे मला आवडत नाही. पण गेल्या वर्षी माझ्या हातून चूक घडली. जेव्हा मला त्या चुकीची आठवण होते, तेव्हा मला खूप वाईट वाटते. गेल्या वर्षीचा तो दिवस. सहामाही परीक्षा चालू होती. विज्ञानाची परीक्षा होती. प्रश्नपत्रिका हातात आली.

मी संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचली आणि मला घामच फुटला! बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मला आठवत नव्हती. मी खूप घाबरलो. मी मग माझी विज्ञानाची वही गुपचूप घेतली. कोणालाही कळले नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरे वहीत बघितली आणि लिहिली. मी कॉपी केली! नंतर परीक्षेचा निकाल लागला. विज्ञान विषयात मला सर्वात जास्त गुण मिळाले! बाईंनी माझी खूप स्तुती केली.

मला मात्र खूप वाईट वाटले. मी आईला सगळी हकिकत सांगितली. मी सत्य सांगितले, म्हणून आईला आनंद झाला. तिने सांगितल्याप्रमाणे मी बाईंना पत्र लिहिले. त्यांची माफी मागितली. बाईनाही आनंद झाला. त्यांनी मला शाबासकी दिली.

वरील निबंध हा खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • माझ्या हातून झालेली चूक निबंध मराठी / majhya hatun jhaleli chuk nibandh marathi
  • चूक निबंध मराठी /  mistake nibandh marathi
  • चुकी वर  निबंध / my mistakes essay in marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझ्या हातून झालेली चूक मराठी निबंध | Majhya Hatathun Jhaleli chuk Var Nibandh कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

Leave a Comment