महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध / Mahavidyalayin Vidyarthyanche Manogat Essay In Marathi

या पोस्ट मध्ये आपण आजच्या महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध लेखन / Mahavidyalayin Vidyarthyanche Manogat Essay In Marathi 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत

Mahavidyalayin Vidyarthyanche Manogat Essay In Marathi

Mahavidyalayin Vidyarthyanche Manogat Essay In Marathi

आजच्या महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत

[ मुद्दे : महाविदयालयात प्रवेश घेताना असलेल्या अपेक्षा -प्रत्यक्ष अनुभव शालेय जीवन व महाविदयालयीन जीवन यांचीतुलनाअभ्यासातील गैरसोयी अभ्यासेतर कार्यक्रमांतीलअनुभव व्यसनाधीनता परीक्षार्थी वृत्ती खऱ्या ज्ञानापासून दूर – महाविदयालयीन शिक्षण महाग -त्यानंतरही नोकरीबाबत अनिश्चितता ]

महाविदयालयात शिकणारा मी एक सामान्य विदयार्थी आहे. मला आठवतेय मी महाविदयालयात आलो, तेव्हा या जीवनाचे इतरांनी ‘फुलपाखरी जीवन’ असे वर्णन केले होते. महाविदयालयीन जीवन म्हणजे ‘मज्जाच मजा’ असेच चित्र बहुतेक जण रंगवतात.

पण माझा अनुभव मात्र तसा नाही. महाविदयालयात पाऊल टाकताना प्रथम माझ्यावर मात्र फार मोठे दडपण होते. शाळेतील वातावरण अगदी वेगळे होते. पूर्व-प्राथमिक वर्गापासून दहावीपर्यंत मी एकाच शाळेत होतो.

त्यामुळे त्या शाळेशी आमचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. महाविदयालयात हा जिव्हाळा मात्र मला कुठेच आढळला नाही. काही विदयार्थी आपला कंपू करून असतात; पण ते बहुधा अभ्यासेतर गोष्टींसाठी बरीचशी मुले आपला महाविदयालयातील वेळ वर्गाबाहेर कट्ट्यावर किंवा कँटीनमध्ये घालवतात.

वर्गात विदयार्थ्यांची संख्या एवढी असते की, आपण शिकवतोय ते या विदयार्थ्यांना कळत आहे की नाही, याकडे प्राध्यापक विशेष लक्षही देऊ शकत नाहीत. बहुसंख्य विदयार्थी कुठे ना कुठे खाजगी शिकवणी वर्गांना जात असल्यामुळे विदयार्थ्यांनाही महाविदयालयातील शिक्षण महत्त्वाचे वाटत नाही.

जे विदयार्थी कुठल्याही खाजगी वर्गाला जाऊ शकत नाहीत, त्यांचे मात्र नुकसान होते. त्याची कुणालाही तमा नसते. महाविदयालयात वक्तृत्व, अभिनय, गायन, खेळ इत्यादी अनेक उपक्रम चालू असतात, पण सत्य सांगायचे, तर महाविदयालयातील ठरावीक मुलेच त्यांत सहभागी होतात.

बहुसंख्य विदयार्थी हे प्रेक्षक वा अलिप्त असतात; काही वेळेला तास ‘बंक’ करण्याची टूम निघते, तर काही वेळेला सामुदायिक सुट्टी घेण्याचा कार्यक्रम आखला जातो. मात्र, महाविदयालयातील विविध ‘डे’ज महाविदयालयातील वातावरण उत्फुल्ल,

रंगीबेरंगी बनवून टाकतात. त्या वातावरणात आम्ही सारे न्हाऊन निघतो. चॉकलेट डे, रोझ डे, ट्रॅडिशनल डे, फ्रेंडशिप डे, व्हॅलेन्टाईन डे इत्यादी विविध ‘डे’च्या निमित्ताने महाविदयालयातील वातावरणाला बहर येतो.

महाविदयालयात अनेक चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टींची लागण लागलेली असते. बरीच व्यसने पसरलेली असतात. छुपेपणाने त्यांचा प्रसार चालू असतो. त्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवणे, हे काहीजणांना फार अवघड जाते.

महाविदयालयातील बहुसंख्य विदयार्थी हे परीक्षार्थी असतात. ज्ञानार्थी विदयार्थी तेथे कमीच आढळतात. हे खरे शिक्षण ठरेल का? दिवसेंदिवस महाविदयालयीन शिक्षण हे अतिशय महाग होत चालले आहे.

त्याबरोबरच हे शिक्षण घेतल्यावरही आपले भवितव्य उज्ज्वल होईल, याची विदयार्थ्याला खात्री नसते. किंबहुना ‘पदवी’ प्राप्त केल्यावरही अनेकदा तो ‘बेकारी’च्या प्रवाहात गटांगळ्या खात राहतो.

मग त्याच्यापुढे प्रश्न उभा राहतो- ‘काय उपयोग या महाविदयालयीन शिक्षणाचा?

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध / Shaletil Vidyarthyanche Manogat Marathi Nibandh
  • महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध लेखन / Essay Writing On Mahavidhyalayatil Vidhyarthyanche Manogat
  • विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी मध्ये / Vidhyarthyanche Manogat Essay In Marathi

आम्हाला आशा आहे की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध / Essay On Mahavidhyalayatil Vidhyarthyanche Manogat Essay In Marathi हा निबंध नक्कीच आवडला असेल धन्यवाद,

Leave a Comment