Life Insurance Corporation of India LIC Information In Marathi

lic Information In Marathi

lic information in marathi

Life Insurance Corporation of India Policy Number

how many digits policy numbers in LIC ? / LIC पॉलिसी क्रमांक किती अंकी असतो 

पॉलिसी क्रमांक नऊ अंकी असतो व आपल्या Policy बंधपत्राच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात तो तुम्हाला आढळेल. हा एक विशिष्ट ओळख देणारा क्रमांक असून ह्यामुळे आपली Policy इतर पॉलिसीपासून वेगळी राहते व आजीवन ती तशीच राहते. पत्र व्यवहार करताना हा Policy Number लिहिण्यास विसरू नका, कारण ह्यामुळे आपली पॉलिसी जलद मिळण्यास मदत होते.

Conditions of Life Insurance Corporation of India Policy Number / पॉलिसीच्या अटी 

प्रत्येक पॉलिसी निराळ्या कारणासाठी घेतली जाते त्यामुळे आपल्या पॉलिसीच्या अटी व नियम Terms and Conditions of Life Insurance Corporation of India Policy Number आपल्या Policy चा प्रकार व कालावधी वर अवलंबून असेल. वर नमूद केलेली माहिती व इतर माहिती जसे, नामनिर्देशित, आपला पत्ता, आपल्या पॉलिसीच्या पहिल्या पानावर पॉलिसी शेड्युल मध्ये नमूद केलेली असेल. पॉलिसी सुरु झालेली तारीख, जन्म तारीख, पक्वतेची तारीख, हप्ता भरण्याची तारीख व महिना ही त्यामध्ये नमूद केलेले असते. दुसर्‍या पानापासून, पॉलिसीच्या विविध अटी, घेतलेली जोखीम, पर्याय दिला असेल तर घेतलेली वाढीव जोखीम, सर्व पॉलिसीना मिळणारे नियमित फायदे, जर पर्याय निवडला असेल तर अपघात विमा फायदे, एखादी जोखीम घेतलेली नसेल तर तिची माहिती व इतर अटी वगैरे गोष्टी विमा करारात नमूद केलेल्या असतील. मृत्यु पश्चात मिळणार्‍या फायद्या व्यतिरिक्त विमा धारकाने निवडलेले व इतर अनेक फायदे आहेत, ज्याची माहिती आपण करून घेऊ शकता

( विमा पॉलिसीच्या अनेक फायदे व अटी व त्याचे परिणाम )

Changes in Policy of LIC / पॉलिसीमध्ये बदल

आपल्या पॉलिसीचा हप्ता देण्याच्या पध्दतीत बदल करणे, वा हप्त्याचा कालावधी कमी करणे असे बदल करण्याचे प्रसंग आपल्यावर येऊ शकतात. अशा स्थितीत आपणास सेवा देणार्‍या शाखेस आपला लेखी अर्ज द्यावा. आपल्या विमा पॉलिसीमध्ये अनेक बदल आपणास करता येतील.

(बदल जाणून घेण्यासाठी येथे पॉलिसीमध्ये बदल)

How to restore lost lic policy /  lic पॉलिसी गहाळ झाली तर काय?

आपली पॉलिसी गहाळ झाली आहे ह्या निर्णयाप्रत येण्यापूर्वी आपल्या घरी, आपल्या निवेशाचे इतर कागद पत्र, कामाच्या ठिकाणी, किंवा काही कारणासाठी आपल्या एजंटाकडे आपण विम्याचे कागद पत्र दिले असण्याची शक्यता आहे, अशा रितीने सर्व ठिकाणी पॉलिसीचा शोध घ्या. कदाचित पॉलिसी चे कागद पत्र आयुर्विमा महामंडळाकडे किंवा इतर वित्तीय संस्थेकडे कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेले असण्याची शक्यता आहे. जर आपण आयुर्विमा महामंडळाकडून कर्ज घेतले असेल तर महामंडल पॉलिसी बंधपत्र आपल्याकडे ठेवते. ह्याचीही खात्री करा की जे कागदपत्र आपण शोधत आहात ते आधीच आयुर्विमा महामंडळाला वा इतर वित्तीय संस्थेस असाईन तर केले नाही ना. जर नैसर्गिक आपत्ती जसे आग, पूर ह्यामुळे पॉलिसी अंशतः नष्ट झाली असेल , तर पॉलिसीचा उरलेला भाग, पुरावा म्हणून, आयुर्विमा महामंडळाकडे, डुप्लीकेट पॉलिसी साठी अर्ज करताना, पाठवा. जर तुमचीअशी खात्री झाली असेल की काहीकारणाने पॉलिसी मिळणे अशक्य आहे,तर अशा वेळेस डुप्लीकेट पॉलिसी मिळण्यासाठी सोप्या उपायाचा अवलंब करावा Your Contact Address – Keep Posted to Life Insurance Corporation of India Without Fail आपला संपर्काचा पत्ता कळणे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्याशिवाय आम्ही आपणासोबत आमच्या सेवांसाठी संपर्क साधू शकणार नाही. केवळ आपला संपर्काचा पत्ता नाही म्हणून आपणास मिळणार्‍या फायद्यापासून आम्ही आपणास वंचित ठेवू इच्छित नाही. जेव्हा तुम्ही आपले निवास स्थान बदलता तेव्हा आपला नवीन पत्ता आम्हाला अवश्य कळवा. नाहीतर आम्ही आपणास, हप्तासंबंधी पत्र, पॉलिसीच्या पक्वतेसंबंधी पत्र, किंवा जीवित असताना मिळणारे फायदे ह्याविषयी पाठवलेले पत्र आपणास मिळण्यास विलंब लागेल. आपल्या विमा पॉलिसीमध्ये आपल्या निवासामध्ये, आपल्या दूरध्वनी क्र वा भ्रमण ध्वनी क्रमांकामध्ये वा ईमेल पत्त्यात काही बदल झाल्यास त्याची माहिती कळवण्याची तरतूद आहे. आपल्याला सेवा देणार्‍या शाखेस हे बदल आपल्या पॉलिसीमध्ये करण्यास सांगा.

(डुप्लीकेट पॉलिसी मिळण्यासाठी काय करावे हे जाणण्यासाठी येथे LIC Official Page )

Admission Of Age in LIC / वय नमूद करणे

आपल्या पॉलिसीचे बंधपत्र नीट वाचा व आपली जन्म तारीख त्यामध्ये नीट नमूद केली आहे की नाही ते पाहा. कारण ह्यावरच आपल्याला किती रकमेचा हप्ता द्यावा लागेल हे ठरवले जाते. शिवाय ह्यावरच आपण आमच्या कडून घेऊ शकणार्‍या भावी पॉलीसी ठरवल्या जातात. जर ह्यापूर्वी आपण घेतलेल्या पॉलिसीमध्ये आपली जन्म तारीख नमूद केलेली नसेल, व आपणाकडे सक्षम अधिकार्‍याने जारी केलेले जन्म तारखेचे प्रमाणपत्र असेल , तर त्याची एक साक्षांकित प्रत, जन्म तारीख नमूद करण्याच्या विनंतीअर्जासह तुम्ही आम्हाला पाठवा

(जन्म तारखेचे कोणते प्रमाण पत्र आयुर्विमा महामंडळाकडे स्विकार्य आहेत ते जाणण्यासाठी येथे प्रमाण पत्र )

 

नामनिर्देश / Mentioned Name in  Life Insurance Corporation of India

नामनिर्देशित व्यक्तीचे नाव अचूक लिहिले आहे ह्याची खात्री करा. पॉलिसीच्या कालावधीत नामनिर्देशित व्यक्तीमध्ये बदल करता येतो. जर अजूनपर्यंत आपण आपल्या पॉलिसीमध्ये नाम निर्देशित व्यक्तीचे नाव नमूद केले नसेल,तर उशीर करू नका, आम्हाला लगेच कळवा. जी शाखा आपणास सेवा देत आहे तेथेच नाम निर्देशन बदल करता येतो ह्याची नोंद घ्या. नामनिर्देशित व्यक्ती ती असते जिला विम्याच्या दाव्याची पूर्ण रक्कम देय असते, जर विमा कालावधीमध्ये आपणास विमा पॉलीसीमध्ये नमूद केलेली एखादी दुर्दैवी घटना झाली. सामान्यपणे,आपणास काही झाले तर आपल्या कुटुंबास वा नामनिर्देशित व्यक्तीस, जी आपल्या अनुपस्थित कुटुंबाची,अवयस्क मुलांची जबाबदारी उचलते, जी शक्यतो पत्नी असते वा मुले असतात, त्यांना पॉलिसीचा फायदा मिळावा ह्या उद्देशाने पॉलिसी घेतली जाते. आपण आपल्या अवयस्क मुलांचे नामनिर्देशन करू शकता, ज्या करता आपणास एका व्यक्तीस पालक म्हणून नेमावे लागते.

 

नियुक्ति / Nomination

जर आपण आपल्या विम्यावर आयुर्विमा महामंडळाकडून वा इतर वित्तिय संस्थेकडून कर्ज घेत असाल तर आपली पॉलीसी विम्यावर आयुर्विमा महामंडळाकडून वा इतर वित्तिय संस्थेस असायन करावी लागेल. जेव्हा पॉलीसी असायन केली जाते तेव्हा ती तुमच्या ऐवजी जिला असायन केली आहे तिच्या नावे केली जाते. कर्ज फेडल्यानंतर ती पॉलिसी पुन्हा तुमच्या नावावर केली जाते.अशा प्रकारे पॉलिसी पुन्हा तुमच्या नावावर झाल्यानंतर, नाम निर्देशन नव्याने करावे लागते. जेव्हा कर्ज नको असते तेव्हा विशेष कारणासाठी पॉलिसी असायन करता येते.

 

हप्ता केव्हा भरावा / When To Pay The Premiums

जरी आमची नोटीस आपणास मिळाली नाही तरी विम्याचा हप्ता वेळेत भरा., कारण पोस्टामध्ये विलंब लागू शकतो. आयुर्विमा महामंडळ सामान्यपणे, हप्ता भरण्याची नोटीस एक महिना आधी पाठवते. विम्याचा हप्ता केव्हा देय आहे हे विमा पॉलिसीच्या पहिल्या पानावर नमूद केलेले असते.

 

हप्ता भरण्यासाठी सवलतीचा कालावधी / Grace Period For Premium Payment

जरी तुम्ही हप्ता वेळेत भरला नसेल तरी व्याज न भरता हप्ता भरता येतो. अशा कालावधीस(काही प्लान वगळता) सवलतीचा कालावधी म्हणतात. हा सवलतीचा कालावधी १५ दिवसांचा असतो. ज्या ठिकाणी हप्ता भरणा करण्याचा कालावधी त्रैमासिक, अर्ध वार्षिक वा वार्षिक असतो, तेव्हा सवलतीचा कालावधी एक महिन्याचा , म्हणजे ३० दिवसापेक्षा कमी नाही, असतो.

 

हप्ता कोठे व कसा भरायचा? / How And Where To Pay The Premiums of lic

 1. स्थानिक शाखेमध्ये रोख, स्थानिक धनादेश (चेक वटण्याच्या अटीस अधीन राहून )वा डी डी द्वारे हप्ता भरता येतो.
 2. डी डी, धनादेश, वा मनी ऑर्डर पोस्टाद्वारे पाठवता येतात.
 3. आपण आपला हप्ता कोणत्याही शाखेत भरू शकता कारण ९९% शाखा नेटवर्क द्वारे जोडलेल्या आहेत.
 4. हप्ते भरण्यासाठी अनेक बँका निश्चित सूचना स्विकारतात.
 5. अशा प्रकारे निश्चित सूचना देऊन बँकाना, आपल्या खात्यात डेबिट करून आयुर्विमा महामंडळास विहित महिन्यात विहित तारखेस विम्याच्या हप्त्यापोटी बँकेचा धनादेश देण्यास सांगता येते.
 6. इंटरनेटच्या माध्यमातून – विम्याचा हप्ता इंटरनेटच्या माध्यमातून एच डी फ सी बँक, आय सी आय सी आय बँक, टाईम्स मनी, बिल जंक्शन, यु टी आय बँक , बँक ऑफ पंजाब, सीटी बँक, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक व बिल डेस्क द्वारे भरता येतो.
 7.  कॉर्पोरेशन बँक व यु टी आय बँकेच्या एटीएम द्वारे ही विम्याचा हप्ता भरता येतो. इलेक्ट्रॉनिक क्लीअरींग सर्विसद्वारेही विम्याचा हप्ता भरता येतो ही सेवा मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली, कानपूर,बंगलुरु,, विजयावाडा, पटणा, जयपूर, चंडीगड, तिरुअनंतपुरम, अहमदाबाद, पुणे, गोवा, नागपूर, सिकंदराबाद, व विशाखापट्टणम येथे उपलब्ध आहे.
 8. लोकल क्लीअरिंग चा सदस्य असलेल्या कोणतेही बँकेस विमा भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक क्लीअरींग सर्विस चा फायदा घेता येतो.. ह्या सेवेचा फायदा घेण्यासाठी पॉलिसीधारकास आमच्या विभागीय कार्यालयात मँडेट फॉर्म भरून द्यावा लागेल जो बँकेकडून प्रमाणित करून घ्यावा लागेल.अशा प्रकारे प्रमाणित केलेला फॉर्म आमच्या विभागीय कार्यालयास द्यायचा आहे. पॉलिसी भारतात कोठेही घेतलेली असो.
 9. इंडस्ट्रिअल अ‍ॅशुरंस बिल्डिंग,चर्चगेट, न्यु इंडिया बिल्डिंग, सांताक्रुज, जीवन शिखा बिल्डिंग, बोरिवली येथील सीटीबँकेचे किओस्क केवळ विम्याचे हप्ते धनादेशाद्वारे गोळा करण्यासाठी कार्यरत आहेत.

 

 

पॉलिसीची स्थिती – कोठे पहायला मिळेल? / How to check lic Policy Status – Where Available

पॉलिसीच्या स्थितीवरून आपणास हे कळते की पॉलिसी अद्याप सक्रिय आहे किंवा हप्ता न भरल्यामुळे रद्द झाली आहे. आपल्या पॉलिसीबद्दल इतर महत्वाची माहितीही ह्यावरून मिळते. आपल्याला सेवा देणार्‍या शाखेत आपल्या पॉलिसीची स्थिती कळू शकते. काही शहरामध्ये सुरु असलेल्या प्रतिसाद देय आवाजी प्रतिसाद प्रणालीद्वाराही ही माहिती कळू शकते  जी शहरे संगणक प्रणाली द्वारा जोडली गेली आहेत अशा शहरातील आमच्या शाखेमध्येही ही माहिती मिळू शकते. जी शहरे इंटरनेट ने जोडली गेलीआहेत अशा शहरात ही आता इंटरनेट द्वारा विम्याच्या पॉलिसीची स्थिती कळू शकते.काही निवडक शहरामध्ये टचस्क्रीन किओस्क ही उभारण्यात आले आहेत जेथे आपण आपल्या पॉलिसीची स्थिती जाणून घेऊ शकता.

 

रद्द झालेल्या पॉलिसीला पुनर्जिवित करणे / how to revive lic policy online in marathi 

वेळेत हप्ता न भरल्यामुळे जर तुमची पॉलिसी रद्द झाली असेल, तर, जोपर्यंत तुम्ही तुमची पॉलिसी पुनर्जिवित करीत नाही, तोपर्यंत, पॉलिसीच्या अटी व नियम रद्दबातल होतात. न भरलेले हप्त्याची रक्कम व्याजासकट भरून आरोग्याबाबत च्या अटीची पूर्तता करून पॉलिसी पुनर्जिवित करावी लागते. आपल्या विम्या च्या पॉलिसीमुळे देय असलेल्या हमी रकमेचा फायदा आपल्या कुटुंबास मिळण्यासाठी आपली पॉलिसी सदैव सक्रिय ठेवा. काही अववाद वगळता, जितक्या कालावधीसाठी पॉलिसी घेतली आहे त्यावरून अवलंबून काही दाव्यामध्ये सवलती मिळू शकतात

पॉलिसीवर कर्ज घेणे / Availing Loans On LIC Policies

आमच्या पॉलिसींपैकी बर्‍याच पॉलिसी स्थायीदान -एंडोमेंट स्वरूपाच्या आहेत व जर तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल तर आपण ह्या पॉलिसीवर कर्ज काढू शकता. तुम्ही व्याजासह कर्जाची परतफेड करू शकता किंवा व्याज भरणे चालू ठेवू शकता व दाव्याची रक्कम मिळण्याच्या वेळेस कर्जाची रक्कम कापून घेतली जाऊ शकते. आधीचे कर्ज फेडून झाल्यावर पॉलिसीवर आणखी कर्ज ही मिळू शकते. तुमच्या विनंतीनुसार, आयुर्विमा रकमेच्या आधारावर वित्तीय संस्थाही कर्ज देतात .

 

पॉलिसी परत करण्याचे मूल्य / Surrender Value of lic policy

जर मुदतीपूर्वीच तुम्हाला पॉलिसी महामंडळाला परत करायची असेल तर तुम्ही भरलेल्या रकमेपैकी तुम्हाला मिळणार्‍या रकमेस परत करण्याचे मूल्य म्हणतात. विम्याचे हप्ते तीन वर्षे भरल्यानंतरच पॉलिसी परत करता येते. जर ती सहभागी पॉलिसी असेल तर प्रचलित नियमानुसार त्यास बोनस ही लागू होतो. त्यामुळे पॉलिसी परत करण्याची शिफारस आम्ही करणार नाही कारण पॉलिसी परत करण्यामुळे त्या प्रमाणात कमी रक्कम मिळते. जर तुम्ही ह्या वेळेस दुसरी विमा पॉलिसी घेण्याच्या विचारात असाल , तर दुसरी पॉलिसी तुम्हाला अधिक हप्त्याची रक्कम देऊन घ्यावी लागेल कारण आधीची पॉलिसी घेतल्यापासून तो वेळेपर्यंत आपले वय जास्त झाले असेल. म्हणून आपली आधीची पॉलिसी चालू ठेवणे व इतर पॉलिसी रद्द न करता सक्रिय ठेवणेच आयुर्विम्याचे संरक्षण मिळण्यासाठी श्रेयस्कर.(दावा करण्याच्या पध्दतीबद्दल माहितीसाठी येथे क्लीक करा) पक्वता, जिवित असण्याचे फायदे, अपंग व मृत्यु पश्चात फायदे  जेव्हा तुमचे जिवित असण्याचे फायदे (पैसे परत मिळण्याच्या पॉलिसीकरता) किंवा पक्वतेचे फायदे देय होतात, तेव्हा आम्ही आपणास पूर्वसूचना देतो. परंतु जर जिवित असण्याचे फायद्याची रक्कम रू.६००००/- अगर त्यापेक्षा कमी असेल , तर ती तुम्हाला पॉलिसी ची वाट न पाहता वा मुक्तता प्रपत्र न भरता , काही अपवाद सोडून, थेट पाठवली जाईल. जर अशा प्रकारची पूर्व सूचना तुम्हाला मिळाली नसेल तर आम्हाला कळवा म्हणजे आम्हाला योग्य ती कारवाई करता येईल.

वेतन बचत योजने अंतर्गत पॉलिसी / Policies Under Salary Savings Scheme

जर आपण आपली पॉलिसी वेतन बचत योजने अंतर्गत घेतली असेल तर खालील सूचना वाचा.

 1.  प्रत्येक वेतन बचत योजने अंतर्गत पॉलिसीसाठी आपले मालक आपल्या वेतनातून रक्कम कापतात व एका ठराविक शाखेत अशा जमा केलेल्या रकमेचा एकच धनादेश भरतात, जेथे सर्वांच्या पॉलिसीच्या फाईल्स ठेवलेल्या असतात.
 2. आपल्या पॉलिसीची फाईल कोणत्या शाखेमध्ये ठेवलेली आहे हे तुम्ही एजंट कडून किंवा आपले वेतन काढणार्‍या विभाग़ाकडून शोधून काढू शकता. हे शोधून काढणे महत्वाचे आहे कारण जेव्हा पॉलिसी पक्व होते तेव्हा देय रक्कम मिळण्यासाठी ही माहिती उपयुक्त असते. तसेच पत्त्यातीलबदल किंवा कर्ज घेणे हयासाठी हे गरजेचे आहे.
 3. जर तुमची नोकरी बदलीची असेल तर तुमचा नवीन पत्ता आयुर्विमा महामंडळाला कळवणे आवश्यक आहे.
 4.  जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी रूजू होता तेव्हा विम्याच्या हप्त्याची रक्कम कोणत्या शाखेत जमा केली जाते ह्याची चौकशी करा व आपल्या आधीच्या विम्याच्या शाखेस कळवा म्हणजे तुमची पॉलिसीची फाईल त्या शाखेस स्थानांतरित केली जाईल.
 5. अशा प्रकारे आपले विम्याचे रेकॉर्ड योग्य ठिकाणी स्थानांतरित होतील व आपल्याला आमच्याकडून पक्वतेसारख्या सेवा वेळात मिळतील.
 6. जर तुम्ही सध्याची नोकरी सोडून नवीन नोकरीच्या ठिकाणी रूजू होणार असाल तर , एक तर सध्याची वेतन बचत योजना तुम्ही नवीन ठिकाणी चालू ठेवू शकता किंवा हप्ता भरण्याचा पर्याय त्रैमासिक,अर्ध वार्षिक, वार्षिक अशा प्रकारे बदलू शकता.
 7.  पॉलिसी पुन्हा पुन्हा जिवित करणे टाळण्यासाठी हप्ता नियमितपणे भरा.बदलीची नोकरी करणार्‍याना असे करणे अवघड वाटत असेल.आमच्याकडे थेट हप्ता पाठवू नका. तुमचा हप्ता तुमच्या मालका कडूनच आला पाहिजे. कोणत्याही विमाधारकाकडून थेट हप्ता गोळा करण्याची पध्दत आमच्याकडे नाही. किंवा हप्ता भरण्याच्या पध्दतीत बदल करून त्रैमासिक,अर्ध वार्षिक, वार्षिक करून थेट आमच्याकडे हप्ता भरा.
 8. अशा प्रकारे हप्ता भरताना तुम्हाला सवलत मिळेल. आमच्याकडे आपला कायमचा पत्ता पाठवा, म्हणजे आम्ही आपणाकडे काही वर्षानंतरही संपर्क साधू शकू.

हे पण वाचा

विमा म्हणजे काय ? 

वरील  सर्व माहिती LIC च्या धोरण मार्गदर्शक तत्त्वे आणि हेल्पलाइन पेज वरील आहे

Leave a Comment

x