कुटुंबातील वयस्कर स्त्री मराठी निबंध | Kutumbatil Vaysakar Stri Essay In Marathi

या पोस्ट मध्ये आपण कुटुंबातील वयस्कर स्त्री मराठी निबंध | Kutumbatil Vaysakar Stri Essay In Marathi 100 ते 400 शब्दातनिबंध लेखन 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत

Kutumbatil Vaysakar Stri Essay In Marathi

कुटुंबातील वयस्कर स्त्री निबंध

माझ्या मानसीआजीचा आम्ही नुकताच सत्तरावा वाढदिवस साजरा केला. आम्हांला वाटले, मानसीआजी आता थकली असेल. तिचे नेहमीचे व्यवहार आता मंदगतीने चालतील. पण, कसले काय! आजी नेहमीप्रमाणे पाचच्या ठोक्याला उठली. सगळ्यांसाठी चहा केला. स्वत: घेतला आणि बूट, पंजाबी ड्रेस घालून बाहेर पडलीसुद्धा. त्यानंतर साडेसहा वाजता दूध व भाजी घेऊन स्वारी दारात हजर.

घरात आईला नाश्ता तयार करण्यासाठी मदत केली आणि निवांतपणे पेपरवाचन करीत बसली. लहानपणापासून मी वयस्क व्यक्तीचे चित्र काढताना हातात काठी घेतलेली, वाकून चालणारी, तोंडाचे बोळके झालेली स्त्री काढली होती. वेशभूषा स्पर्धेत वयस्क स्त्रीची वेशभूषा मी थरथर कापणाऱ्या व चाचरत बोलणाऱ्या आजीबाईप्रमाणे केली होती. परंतु मानसीआजी तशी वाटतच नव्हती. “काय रहस्य असेल बरे?” एकदा तिच्याशी बोलायला हवे.

एके दिवशी वेळ काढून मी तिच्याजवळ जाऊन बसले. ती लॅपटॉपवर समाजसेवी संस्थांची माहिती पाहत होती. तिने लॅपटॉप बंद केल्यावर मी तिला विचारले की, “तू आजी असूनही आजीसारखी का वाटत नाहीस?” मानसी आजीच्याचेहऱ्यावर हसू फुलले. ती म्हणाली, “बरं झालं तू मला हा प्रश्न विचारलास; कारण तुम्ही आधुनिक पिढीचे आधारस्तंभ, तुम्हांला तर आमच्याही पेक्षा खूप काळ सुदृढ आणि सक्षम राहता येईल.” ती पुढे म्हणाली, “अगं, आम्ही एकविसाव्या शतकातील स्त्रिया आहोत.

मीच काय, माझ्यासारख्या बऱ्याचजणी ‘सुदृढ वयस्क’ तुला दिसतील. माझे १९७०-७२ च्या काळात उत्तमप्रकारे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे. तसेच विसाव्या शतकाच्या अखेरीस स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागल्यामुळे फक्त ‘चूल आणि मूल’ यांतून आम्ही बाहेर पडलो. कुटुंब सांभाळताना नोकरीचा पर्याय आमच्या पिढीने स्वीकारला आणि तेथूनच आमचा लोकसंपर्क वाढला. विविध प्रकारच्या विचारांची देवाणघेवाण सुरू झाली.

घरातल्या चार भिंतींच्या बाहेरील जग नवे अनुभव देऊ लागले. त्यामुळे स्त्रिया अर्थार्जन करता-करताच आपले आरोग्य, आहार, ताणतणाव समायोजन यांबाबत सतर्क राहू लागल्या. मी त्यातलीच एक! कुटुंब सांभाळतानाच स्वत:ला वेळ दयायला शिकले. योग्य आहाराबरोबर व्यायाम, योगासने करू लागले. त्यामुळे शरीर व मन खंबीर व्हायला मदत झाली. “माझ्याही आयुष्यात अपघात, आपत्ती आल्या. त्यामुळे मनावर ताणही आला. पण मी त्या ताणांचा सामना करू शकले.

माझे स्वत:चे ‘आर्थिक नियोजन’ व रेडिओ-दूरदर्शनवरील ‘मैत्रिणींचा समंजस सल्ला’ मला अशा संकटकाळी धीर देण्यास उपयोगी ठरला. “आपल्या कुटुंबातील सर्वांशीच माझे पटते असे नाही. पण सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न मी मनापासून करते.

त्यामुळे तुझ्या रागीट आजोबांच्याबरोबर मी समाधानाने संसार करू शकले. सध्या मी निवृत्त आहे, आणि समाधानी आहे, कारण घरातील नेहमीची कामे करून मी महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या अंध विदयार्थ्यांना संदर्भ पुस्तके शोधायला व वाचायला मदत करते. आवडेल तेथे पर्यटनाला जाते. त्यामुळे मन प्रसन्न राहते. या सगळ्यांमध्ये म्हातारपण माझ्या जवळ येऊ दयायला मलाच वेळ नाही.” मानसीआजीकडून हे सारे ऐकले आणि ती नेहमी तरतरीत व उत्साही का असते, ते कळले. आपणही आता आळस झटकून स्वत:ची कामे तत्परतेने करायला शिकले पाहिजे, हे मी मनाशी पक्के ठरवले.

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • कुटुंबातील वयस्कर स्त्री मराठी निबंध / kutumbatil vayaskar stri Marathi Nibandh
  • वयस्कर स्त्री निबंध लेखन मराठी / vayaskar stree Essay In Marathi
  • आजच्या काळातील स्त्री निबंध इन मराठी / Aajchya Kalatil Stree Essay In Marathi

आम्हाला आशा आहे की कुटुंबातील वयस्कर स्त्री मराठी निबंध / Essay On Vayaskar Stree Essay In Marathi हे निबंध लेखन नक्कीच आवडले असेल, धन्यवाद..

Leave a Comment