क्रांति दिन स्टेटस, माहिती, कोटस, शायरी, इमेजेस, sms, बॅनर, फोटो, का साजरी करतात इन मराठी | Kranti Din 9 August Best Status, Quotes, Messages Shayari, Banner, Images, Photo In Marathi

WhatsApp Group Join Group

आज 9 ऑगस्ट क्रांति दिन आज या पोस्ट मध्ये मराठी स्पीक्स Kranti din / क्रांतिदिन का साजरा करतात? क्रांतिदिन स्टेटस, संदेश मराठी बघणार आहोत आणि ते तुम्ही Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता

क्रांती दिन का साजरा करतात? / Kranti Din Information In Marathi

आजच्या दिवशी 1942 साली महात्मा गांधीजींनी ‘छोडो भारत’ व ‘करेंगे या मरेंगे’ चा नारा दिला होता. यामुळे संपूर्ण देश पेटून उठला. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्‍या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा 9 ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्फूर्तीदायी ठरलेल्या या दिवसाची आठवण तसेच नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिन साजरा केला जातो.

देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी पुढे आंदोलनांना सुरवात झाली. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे? असा प्रश्न त्यांना पडला होता. अशात हे आंदोलन देशभर पसरणार म्हणून 9 ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनके काँग्रेस नेत्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले. भारतीय जनमानसात असंतोषाचा विस्फोट झाला त्यामुळे ब्रिटिश शासन भयभीत झाले. एकाच वेळी देशभर कारवाया सुरू झाल्या व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक सत्र सुरू केले अनेक नेते भूमिगत झाले. देशभर पोलीस ठाण्यावर व मामलेदार कचेरीवर, सरकारी कार्यालयांवर मोर्चे निघू लागले.

हातात तिरंगा झेंडा व घोषणा देत लाठीचार्ज व गोळीबार झेलत तिरंगा फडकू लागला. समाजवाद्यांनी भूमिगत कारवायांवर लक्ष केले. रेल्वे स्थानके मोडतोड, रूळ उखडणे, पोस्ट कार्यालय जाळणे, वीज तोडणे, गनिमी पद्धतीने ही कामे सुरू झाली. पोलिसांकडून अटक सत्र सुरू झाले. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिक, स्त्री-पुरुष या आंदोलनात सहभागी झाले. देशभरातील युवकांनी यात भाग घेतला.

देशभर स्वातंत्र्याचे व देशभक्‍तीचे वातावरण निर्माण झाले होते. “चले जाव’मुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना केली. हे आंदोलन उभे राहण्याआधीच ब्रिटिश सरकारने मोडून काढण्याचे ठरवले होते. त्या पद्धतीने देशभर कारवाया केल्या आणि आंदोलन मोडून काढले. पण या आंदोलनाने जगाला वेगळी ओळख दिली. कारण कोणताच सेनापती नसताना स्वातंत्र्याचे युद्ध जनतेने हातात घेतले होते. यामुळेच भारत स्वातंत्…

Krantidin Status In Marathi / क्रांतिदिन स्टेटस मराठी

kranti din क्रांतीदिन स्टेटस फोटो

क्रांती दिवस
स्वातंत्रासाठी सर्वस्व अर्पण
करणाऱ्या क्रांतीकारकांना
🇮🇳🙏 विनम्र अभिवादन 🙏🇮🇳

Kranti Din Quotes In Marathi / क्रांति दिन संदेश मराठी

9 ऑगस्ट क्रांती दिन
🇮🇳🙏 निमित्त विनम्र अभिवादन 🙏🇮🇳

Kranti Din Message In Marathi 

समरणात असुदे
क्रांतिकारकांचे देश प्रेम
त्याग, बलिदान…
जय हिंद जय भारत
🇮🇳🙏 विनम्र अभिवादन 🙏🇮🇳

Krantidin Photo In Marathi / क्रांति दिन फोटो मराठी

kranti din क्रांती दिन बॅनर मराठी

9 ऑगस्ट क्रांतीदिन
🇮🇳🙏 चिरायू होवो 🙏🇮🇳

Krantidin Banner In Marathi 

जे समिधा हुओनी जळले,
स्वातंत्र्यासाठी त्या वीरांच्या चरणी,
आम्ही करितो प्रणिपात
🙏🇮🇳 विनम्र अभिवादन 🇮🇳🙏

Krantidiwas sms In Marathi 

भारत छोडो आंदोलन
क्रांतीदिनी सर्व हुतात्म्यांना
🙏🇮🇳 विनम्र अभिवादन 🇮🇳🙏

क्रांति दिवस मराठी संदेश

9 ऑगस्ट 1942 रोजी
इंग्रजांना परतवून लावण्यासाठी
क्रांतिकारकांनी ‘चले जाव’ चे
देशव्यापी आंदोलन पुकारले
🇮🇳🙏🇮🇳

क्रांति दिन बॅनर मराठी

Kranti din status message in marathi

देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचे
रणशिंग फुंकणाऱ्या सर्व
सेनानींना आज क्रांतिदिनी
शत शत नमन !
🙏🇮🇳🙏

क्रांति दिन बॅनर मराठी

9 ऑगस्ट क्रांतीदिन क्रांतिवीरांना
कोटी कोटी प्रणाम !
🙏🇮🇳🙏

क्रांति दिन मराठी स्टेटस दाखवा 

9 ऑगस्ट क्रांतीदिन
आपल्या भारत देशासाठी
सर्वस्व अर्पण करणाऱ्या
सर्व तेजस्वी क्रांतीकारकांना
🇮🇳🙏विनम्र अभिवादन 🙏🇮🇳

Kranti Diwas Marathi Quotes / क्रांति दिवस मराठी 

9 ऑगस्ट 1942 क्रांतीदिन
तमाम क्रांतिवीरांना
🙏🇮🇳 सलाम आणि अभिवादन 🇮🇳🙏

 

Q. क्रांतीदिन कधी आहे?
Ans: 9 ऑगस्ट रोजी आहे

Q. क्रांतीदिन का साजरा केला जातो?
Ans: 9 ऑगस्ट 1942 साली महात्मा गांधीजींनी ‘छोडो भारत’ व ‘करेंगे या मरेंगे’ चा नारा दिला होता. यामुळे संपूर्ण देश पेटून उठला. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्‍या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा 9 ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्फूर्तीदायी ठरलेल्या या दिवसाची आठवण तसेच नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिन साजरा केला जातो.

आम्हाला आशा आहे की क्रांति दिन स्टेटस, माहिती, कोटस, शायरी, इमेजेस, sms, बॅनर, फोटो, का साजरी करतात इन मराठी | Kranti Din Status, Quotes, Messages Shayari, Banner, Images, Photo In Marathi For Whatsapp, Sharechat, Instagram, Facebook आवडले असतील.  तुमच्याकडे ही काही  लेख असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये कळवा आम्ही तुमचे लेख अपडेट करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद 

WhatsApp Group Join Group
x