कहाणी गोपद्मांची व्रतकथा मराठी | Kahani Gopadmanchi Vratkatha In Marathi

कहाणी हा लोकवाङ्मयाचा एक प्रकार आहे. ( Kahani Gopadmanchi Vratkatha In Marathi )धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा म्हणजेच कहाणी ! व्रतवैकल्याच्या निमित्ताने सांगितली जाणारी गोष्ट ! श्रद्धेने आचरणात येणाऱ्या व्रताची फलनिष्पत्ती सांगणे हा काहणीचा उद्देश असतो. चातुर्मासात आचरणात आणावयाची जी जी व्रते व नियम आहेत, ती केव्हा, कशी व का घ्यावयाची, याचा खुलासा या कहाण्यांमधून होतो. काही कहाण्या देवदेवतांचे माहात्म्य सांगणाऱ्या आहेत.

या पोस्ट मध्ये गणपतीची कहाणी घेऊन आलो आहोत. ( Gopadmanchi Kahani Vratkatha Marathi pdf Download )

कहाणी गोपद्मांची मराठी | Kahani Gopadmanchi In Marathi

Kahani Gopadmanchi Vratkatha In Marathi

ऐका गोपद्मांनो, तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादिक पांची सभा बसलेल्या आहेत, ताशे, मर्फे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत. तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या. मृदुंगांच्या भेऱ्या फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करा रे हांकारा, पिटा रे दांडोरा, गांवात कोणी वाणवशावांचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबोऱ्याला तार लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा!

असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनांत भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं कांही वाणवसा केला नसेल. तेव्हा तें उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं कांही वाणवसा केला नाही. नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला. सुभद्रे सुभद्रे! आखाड्या दशमीपासून तीसपिंपळाचे पारी, तळ्याचे पाळीं व गाईच्या गोठ्यांत काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणे पांच वर्ष करावं. उद्यापनाचे वेळी कुंवारणीला जेवायला बोलवावी. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावां, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसांची मोळी द्यावी, पांचव्या वर्षी चोळी-परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणीं येऊन बसले.

नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं. पुढें सभेत कळलं. सुभद्रा वाणवशाशिवाय आहे, असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पाहतात, तो तिनं वसा वसला आहे. पुढं येतां येतां गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली, ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती. तेव्हां तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या,  मृदुंगाच्या भेया वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. जसं ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं, तुमचं आमचं टळो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संप्रूण (संपूर्ण).

Kahani Gopadmanchi Pdf Download in marathi | गोपद्मांची कहाणी pdf डाउनलोड मराठी

gopadmanchi kahani in marathi

   Download PDF

आपण गोपद्मांची कहाणी मराठी, गोपद्मांची कहाणी मराठी सांगा, Gopadmanchi kahani marathi, Gopadmanchi kahani pdf download free, गोपद्मांची व्रतकथा मराठी, व्रतकथा गोपद्मांची मराठी मध्ये  पाहिलेली आहे. तुम्ही वरील Download PDF बटणावर क्लिक करून गोपद्मांची कहाणी pdf डाउनलोड करू शकता. अशाच कहाणी वाचण्यासाठी marathispeaks.in वर भेट द्या, धन्यवाद

Leave a Comment