कहाणी गणपतीची कथा मराठी | Kahani Ganpatichi In Marathi

कहाणी हा लोकवाङ्मयाचा एक प्रकार आहे. धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा म्हणजेच कहाणी ! व्रतवैकल्याच्या निमित्ताने सांगितली जाणारी गोष्ट ! श्रद्धेने आचरणात येणाऱ्या व्रताची फलनिष्पत्ती सांगणे हा काहणीचा उद्देश असतो. चातुर्मासात आचरणात आणावयाची जी जी व्रते व नियम आहेत, ती केव्हा, कशी व का घ्यावयाची, याचा खुलासा या कहाण्यांमधून होतो. काही कहाण्या देवदेवतांचे माहात्म्य सांगणाऱ्या आहेत.

या पोस्ट मध्ये गणपतीची कहाणी घेऊन आलो आहोत. ( Ganesh Kahani Marathi pdf Download )

Kahani Ganpatichi In Marathi

कहाणी गणपतीची मराठी | Kahani Ganpatichi In Marathi

ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचें तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळें, विनायकाचीं देवळें, रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा ? श्रावण्या. चौथीं घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पश/पायलीचं पीठ कांडावं, अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य. असा गणराज मनीं ध्याइजे; पाविजे; चिंतिले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धि करिजे. ही पांचां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संप्रूण. (संपूर्ण)

Kahani Ganpatichi Pdf Download in marathi | गणपतीची कहाणी pdf डाउनलोड मराठी

ganpatichi kahani marathi

   Download PDF

आपण गणपतीची कहाणी मराठी, गणपतीची कहाणी मराठी सांगा, ganpatichi kahani marathi, ganpati kahani pdf download free पाहिलेली आहे. तुम्ही वरील Download PDF बटणावर क्लिक करून गणपतीची कहाणी pdf डाउनलोड करू शकता. अशाच कहाणी वाचण्यासाठी marathispeaks.in वर भेट द्या, धन्यवाद

Leave a Comment

x