हिरवी संपत्ती मराठी निबंध लेखन | Hiravi Sampatti Essay In Marathi Best 100 Words

या पोस्ट मध्ये आपण हिरवी संपत्ती मराठी निबंध लेखन Hiravi Sampatti Essay In Marathi 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Hiravi Sampatti Essay In Marathi

Hiravi Sampatti Essay In Marathi

निबंध लेखन – हिरवी संपत्ती

[मुद्दे : खेडी भारताचे वैशिष्ट्य – कृषिप्रधान – शेतीतून येणारी समृद्धता -हिरवी संपत्ती भूक भागवते – षड्रसयुक्त अन्न – प्रदूषणावर मात करण्यासाठीझाडे – हिरव्या रंगाची उधळण – औषधी गुण – आयुर्वेदाला पसंती – औषधी झाडांना मागणी.]

आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी आपल्याला सांगितले होते की, ‘युवकांनो, खेड्याकडे चला!’ आपला देश कृषिप्रधान आहे. शेती हीच आपली खरी संपत्ती आहे. ही हिरवी संपत्ती जेवढी निर्माण करू तेवढे आपण अधिक समृद्ध होऊ. पण अनेक वेळा आपण औदयोगिक उत्पादनाच्या मागे लागतो. त्यामुळे हिरव्या उत्पादनाकडे आपले दुर्लक्ष होते.

सजीवांच्या जीवनासाठी हिरवी संपत्ती अतिशय आवश्यक असते. ती आपली भूक भागवते. त्याचबरोबर आपल्या जिभेचे लाडही पुरवते. तिखट मिरची, आंबट चिंच, कैरी, रसाळ आंबा, तुरट आवळा आणि कडू कडुलिंब हे षड्रस या हिरव्या संपत्तीतच येतात. या हिरव्या वनस्पतींमुळे म्हणजे झाडांमुळे हवेतील प्रदूषणही कमी होते.

सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण मिळते आणि हिरव्या रंगाने डोळ्यांना शांती व तृप्ती मिळते. हिरव्या संपत्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील औषधी गुण. आज आयुर्वेदाला जगात मान्यता मिळाली आहे. आयुर्वेद लोकप्रिय झाल्याने औषधी वनस्पतींना खूप मागणी आहे. आपला देश अशा आयुर्वेदीय संपत्तीने समृद्ध आहे.

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • शेती मराठी निबंध लेखन / Farm Essay In Marathi
  • हिरवी संपत्ती निबंध दाखवा / Essay On Hiravi Sampatti
  • हिरवी संपत्तीवर मराठी निबंध लिहा / Write Essay on Hiravi Sampatti In Marathi

पुढील कोणत्याही एका विषयावर 100 शब्दांमध्ये निबंध लिहा?

हिरवी संपत्ती वर मराठी निबंध

हिरवी संपत्ती मराठी निबंध लिहा?

या पोस्ट मध्ये दिलेला निबंध लिहा

तुम्हाला हिरवी संपत्ती मराठी निबंध लेखन / Essay in Marathi On Hiravi Smapatti कसा वाटला ते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा धन्यवाद,