ज्योतिष शास्त्र माहिती मराठी | Jyotish Shastra Information In Marathi Easy

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये ज्योतिष शास्त्र माहिती मराठी मध्ये / Jyotish Shastra Information In Marathi पहाणार आहोत तसेच चंद्रमासाची नावे, सहा ऋतु, पक्ष विचार, तिथीचे प्रकार, नक्षत्रांची नावे मराठी,  योग विचार, अकरा करणे म्हणजे काय?, चंद्रबळ माहिती,  बारा राशी त्यांची नावे तसेच त्यांचे स्वरूप/अर्थ पहाणार आहोत.

ज्योतिष शास्त्र म्हणजे काय? Jyotish Shastra Information In Marathi

ज्योति म्हणजे तेज. आकाशातील ग्रह, नक्षत्रे, तारे, यांचे ज्ञान करून देणारे व भूगोल, खगोल यांचे सम्यक दिक्-देश-कालाचे ज्ञान ज्यावरून समजते, त्या शास्त्रास ज्योतिषशास्त्र म्हणावे.

Jyotish Shastra Information In Marathi

सिद्धांत, संहिता व होरा हे ज्योतिषशास्त्रात तीन मुख्य प्रकार मानले आहेत. कलियुगाची एकंदर ४३२००० वर्षे आहेत. सहा शककर्ते होऊन नंतर कलियुग समाप्त होणार आहे. सांप्रत शालिवाहन शके १९०९ वे चालू आहे. म्हणजे कलियुगाची ५०८७ वर्षे होऊन गेली आणि ४२६९१२ वर्षे कलियुग आहे. वर्षगणना संवत्सरमानाचे (वर्षमानाचे) चांद्र, सौर, सावन, नाक्षत्र, बार्हस्पत्य असे पाच प्रकार आहेत.

चांद्रमासांची नावे

विक्रमसंवत आणि शालिवाहन शक यांची महिन्यांची नावे (चैत्र ते फाल्गुनपर्यंत) सारखीच आहेत. ज्या वर्षी अधिक मास असतो त्या वर्षी १३ महिन्यांचे वर्ष असते. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, या पाच विषयांसंबंधी ज्यात माहिती आहे अशी पुस्तिका, रवि-चंद्राचे भ्रमणावर ही अंगे बनवली जातात. भारतीय पंचांग-पद्धती निरयन मताची आहे.

सहा ऋतु त्यांची नावे

एका संवत्सराचे (वर्षाचे) सहा ऋतु होतात. दोन महिन्यात एक ऋतु होतो. वसंत ऋतूत झाडाला नवी पालवी येते. ग्रीष्म ऋतूत उष्मा अधिक असतो. वर्षा ऋतूत पाऊस असतो. शरद ऋतूत आभाळ स्वच्छ असते. हेमंत ऋतूत थंडी अधिक असते. शिशिर ऋतूत झाडाची पाने गळून पडतात.

पक्ष विचार किती असतात / पक्ष विचार त्यांची नावे मराठी

एका चांद्र महिन्यात दोन पक्ष असतात. १ शुक्ल पक्ष व २. कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षात चंद्राच्या कक्षा वृद्धिंगत होऊन पौर्णिमेस संपूर्ण चंद्रबिंब प्रकाशित होते. त्यामुळे महिन्याचे पहिल्या पंधरवड्यास शुद्ध अगर शुक्ल पक्ष म्हणतात. दुसऱ्या पंधरवड्यास कृष्ण पक्ष म्हणतात. चंद्रबिंबाच्या कला कृष्ण प्रतिपदेपासून क्षय होत जातात, म्हणून या पंधरवड्यास कृष्ण पक्ष अगर वद्य पक्ष म्हणतात. विचार

 तिथी व तिथीचे प्रकार मराठी / Types of Tithi In Marathi

चांद्र महिन्यामध्ये ३० तिथी असतात. पहिल्या पंधरवड्यामध्ये १५ तिथी होतात आणि दुसऱ्या पंधरवड्यामध्ये १५ तिथी होतात. तिथींची नावे १ प्रतिपदा, २ द्वितीया, ३ तृतीया, ४ चतुर्थी, ५ पंचमी, ६ षष्ठी, ७ सप्तमी, ८ अष्टमी, ९ नवमी, १० दशमी, ११ एकादशी, १२ द्वादशी, १३ त्रयोदशी, १४ चतुर्दशी, १५ पौर्णिमा, ३० अमावस्या.

 नक्षत्रांची नावे मराठी मध्ये / Nakshatra Names In Marathi

१ अश्विनी, २ भरणी, ३ कृत्तिका, ४ रोहिणी, ५ मृग, ६ आर्द्रा, ७ पुनर्वसु, ८ पुष्य, ९ आश्लेषा, १० मघा, ११ पूर्वाफाल्गुनी, १२ उत्तराफाल्गुनी, १३ हस्त, १४ चित्रा, १५ स्वाती, १६ विशाखा, १७ अनुराधा, १८ ज्येष्टा, १९ मूळ, २० पूर्वाषाढा, २१ उत्तराषाढा, २२ श्रवण, २३ धनिष्ठा, २४ शततारका, २५ पूर्वाभाद्रपदा, २६ उत्तराभाद्रपदा, २७ रेवती.

योग – विचार माहिती मराठी / Yog Vichar Information

पांचांगात नक्षत्रापुढे योग दिलेले असतात. त्याची घटी, पळे, तिथी नक्षत्रांप्रमाणेच सूर्योदयापासूनची असतात. योग २७ आहेत. १ विष्कंभ, २ प्रीति, ३ आयुष्यमान, ४ सौभाग्य, ५ शोभन, ६ अतिगंड, ७ सुकर्मा, ८ घृति, ९ शूल, १० गंड, ११ वृद्धि, १२ ध्रुव, १३ व्याघात, १४ हर्षण, १५ वज्र, १६ सिद्धी, १७ व्यतिपात, १८ वर्याण, १९ परीघ, २० शिव, २१ सिद्ध, २२ साध्य, २३ शुभ, २४ शुक्ल, २५ ब्रह्म, २६ ऐंद्र, २७ वैधृति.

अकरा करणे म्हणजे काय ? Aakra Karane Meaning In Jyotish

बव, बालव, कौलव, तैतिल, गरज, वणिज, विष्टि (भद्रा), शकुनि, चतुष्पाद, नाग, किंस्तुघ्न. यातील भद्रा हे शास्त्रकारांनी शुभकार्यास वर्ण्य मानले आहे.

 चंद्रबळ मराठी माहिती

उपनयन मुहूर्त लाभतो अगर नाही, तसेच विवाह मुहूर्त लाभतो अगर नाही, हे चंद्रबलावरून ठरवावे.जन्मराशीपासून मुहूर्तदिवशी चंद्र ४, ८, १२ वा असल्यास तो मुहूर्त लाभत नाही असे समजावे. इतर ठिकाणी चंद्रबल असता मुहूर्त आहे असे समजावे. बटूस व वधू-वरांस चंद्रबल अवश्य पहावे.

बारा राशी व त्यांचे स्वामी मराठी माहिती

राशी स्वामी
मेष मंगळ
वृषभ शुक्र
मिथुन बुध
सिंह रवि
कन्या बुध
तूळ शुक्र
वृश्चिक मंगळ
धन गुरु
मकर शनी
कुंभ शनी
मीन गुरु
कर्क चंद्र

राशीचे अर्थ/स्वरूप मराठी / Rashi Meanings In Marathi

राशी अर्थ
मेष मेंढा
वृषभ बैल
मिथुन वीणा घेतलेले व हास्यमुख असे जोडपे.
कर्क खेकडा
सिंह सिंह
कन्या धान्य व अग्नि घेऊन नौकेत बसलेली कन्या
तूळ तागडी घेतलेला पुरुष.
वृश्चिक विंचू
धनु कटि प्रदेशापसून अश्वाकृति असा धनुष्यदारी पुरुष
मकर मृगासारखे मुख असलेला मगर.
कुंभ हातामध्ये गुंभ घेतलेला पुरुष
मीन दोन उलट सुलट मासे

ज्योतिष शास्त्र म्हणजे काय ?

ज्योति म्हणजे तेज. आकाशातील ग्रह, नक्षत्रे, तारे, यांचे ज्ञान करून देणारे व भूगोल, खगोल यांचे सम्यक दिक्-देश-कालाचे ज्ञान ज्यावरून समजते, त्या शास्त्रास ज्योतिषशास्त्र म्हणावे

एकूण राशी किती आहेत?

12 राशी आहेत

अकरा करणे म्हणजे काय ?

बव, बालव, कौलव, तैतिल, गरज, वणिज, विष्टि (भद्रा), शकुनि, चतुष्पाद, नाग, किंस्तुघ्न. यातील भद्रा हे शास्त्रकारांनी शुभकार्यास वर्ण्य मानले आहे.

आम्हाला आशा आहे की ज्योतिष शास्त्र मराठी माहिती / Jyotish Shastra Information In Marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल धन्यवाद,

WhatsApp Group Join Group

Comments are closed.

x