भूक नसतीच तर मराठी निबंध | Bhuk Nastich Tar Essay In Marathi

मित्रांनो या लेखांमध्ये भूक नसतीच तर मराठी निबंध | Bhuk Nastich Tar Essay In Marathi हे निबंध लेखन 300 ते 400 शब्दांमध्ये दिलेले आहे ते तुम्ही वाचू किंवा लिहू शकता.

Bhuk Nastich Tar Essay In Marathi

{ मुद्दे : भुकेबद्दलचे जागोजागी येणारे उल्लेख – भूक नसती तर – धान्य पिकवण्याची – अन्न शिजवण्याची गरज नव्हती – माणूस जास्त आळशी झाला असता-रिकामे मन सैतानाचे घर – आवडत्या कामांना वेळ देता आला असता – भुकेतून गुन्हेगारीचा जन्म – जीवो जीवस्य जीवनम् – भुकेवर ताबा मिळवणे ही सुसंस्कृतता – भोजनाचा आनंद हरवणार }

कोणतातरी सण होता. सार्वजनिक पूजा चालू होती. भटजी मोठ्याने पोथी वाचत होते. ‘अन्नासाठी दाही दिशा। आम्हां फिरविशी जगदीशा।।’ एवढेच चरण माझ्या कानावर पडले आणि त्यांनी मनाला वेढून टाकले. खरोखर या जगातील सगळ्यांची धडपड चालू असते, ती प्रामुख्याने पोट भरण्यासाठी, भूक भागवण्यासाठी.

त्यावेळी मनात विचार आला की खरोखर माणसाला ही भूकच नसती तर… तर किती बरे झाले असते! भुकेमुळे पोटाच्या मागे धावणारे जग पाहिले की, वाटते-ही भूक नसतीच तर ? तर.. तर काय घडले असते?

नुसता विचार केला तरी कळेल… संपूर्ण जगाचे रंगरूपच वेगळे बनले असते!… शेते पिकवावी लागली नसती! धान्य निर्माण करायला लागले नसते आणि घरातील स्त्रियांना रांधा-वाढा व उष्टी काढा ही कटकटीची कामे करावीच लागली नसती. पण मग त्यातून काय मिळाले असते? मला वाटते, आळसाचे साम्राज्य वाढले असते.

उदयोग केलाच पाहिजे, अशी काही आवश्यकता न राहिल्याने रिकामी मने, रिकामी डोकी नको त्या कामात कदाचित गुंतली असती. भूक नसेल, तर अनेक गुन्हे, अत्याचार टळू शकतील. ही भूक भागवण्यासाठी भुकेला माणूस चोरी करतो. पोटाची भूक सख्ख्या भाऊबंदांत भाऊबंदकी सुरू करते. ही पोटाची भूक सहृदय माणसाला निर्दय बनवते.

सुरांचे असुर बनवते. मग मानवांतून दानव निर्माण होतात. ही भूकच असत्याला जन्म देते. अशी ही पोटाची भूक नसतीच तर किती बरे झाले असते! या भुकेच्या अधीन झालेला माणूस विकृत बनतो. म्हणूनच जो आपली भूक बाजूला ठेवून इतरांच्या भुकेचा प्रथम विचार करतो, त्यालाच सुसंस्कृत मानले जाते.

‘जीवो जीवस्य जीवनम्।’ मोठा मासा लहान माशाला गिळून टाकतो, कारण त्याची भूक! ही ‘काळी बाजू’ नजरेआड केली तर काही फायदेही प्रकर्षाने दिसतात. कित्येक वेळा आपल्याला आढळते की, ही पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांना आपली आवडती कामे बाजूला ठेवून पोटासाठी इतर कामे करावी लागतात.

भूक नसतीच तर शिल्पकार आपल्या कलेला वाहून घेतील. लेखक, कवी आपल्याला हवे तसे मनसोक्त लेखन करीत राहतील. शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाच्या कामाला वाहून घेतील. अशी ही भूक-पोटाची भूक नकोच. पण मग शेतीक्षेत्रात प्रयोग कोण करणार ? तरारलेली शेते नेत्रानंद कसा देणार? विविध पदार्थ बनवले जाणार नाहीत.

मग ‘मेजवानी’ सारखे कार्यक्रम कसे होणार? मित्राने दिलेल्या पार्टीचा आनंद कसा मिळणार ? नको रे बाबा! ती कल्पना न केलेलीच बरी! म्हणून मी म्हणतो-भूक ही हवीच. मग रोज रोज जोरात ओरडता येईल-

शाळा सुटली,
पाटी फुटली
आई, मला भूक लागली॥

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा लिहू शकता

  • भूक नसतीच तर  निबंध मराठी / Bhuk Nastich  tar  nibandh marathi
  •  भूक वर मराठी निबंध  / Bhuk var nibandh marathi
  • माणसांना भूक लागल्या नसत्या तर मराठी निबंध / Mansanna Bhuk Laglya Nastya tar nibandh marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा भूक नसतीच तर मराठी निबंध / Essay On Bhuk Nastich Tar In Marathi कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

Leave a Comment