माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध | Avismarniya Prasang Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये आपण अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध | Avismarniya Prasang Essay In Marathi निबंध लेखन करणार आहोत.

Avismarniya Prasang Essay In Marathi

Avismarniya Prasang Essay In Marathi

निबंध लेखन – अविस्मरणीय प्रसंग

मुद्दे: अविस्मरणीय प्रसंगापूर्वीच्या घडामोडी, मनस्थिती – बसमधून प्रवास – बसमध्ये बेवारस बॅग – लोक भयभीत – बस सुरक्षित ठिकाणी नेणे – प्रवासी भराभरा बाहेर – सर्वांची कडक तपासणी – बॉम्बशोधक पथक – बागेच्या तपासणीसाठी खास व्यवस्था – सर्वत्र तणावपूर्ण वातावरण.

माझी तर खूप धांदल उडाली होती. माझी अजूनही वादविवाद स्पर्धेसाठी जोरात तयारी चालूच होती. मी सारख मुद्दे तयार करत होतो आणि विरुद्ध बाजू कल्पून ते खोडूनही काढत होतो. मनातल्या मनात व्यासपीठावरून तावातावाने बोलत होतो. म्हटले तर तयारी झाली होती आणि म्हणले तर झालीही नव्हती. कॉलेजात वेळेवर पोहोचणेही आवश्यक होते आणि मित्रांचा तर अजून पत्ता नव्हता. माझी अस्वस्थता वाढत होती.

त्यातच, वातावरणात एक वेगळाच ताण होता. आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीत दाखल झाले होते. म्हणून दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने देशभर प्रचंड बंदोबस्त ठेवला गेला होता. आमच्या शहरातही सर्वत्र कडक नाकाबंदी केली गेली होती. त्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती. मी तर पूर्ण अस्वस्थ झाला होतो. स्पर्धा कशी होईल? मी यशस्वी होईन का? ही धाकधूक मनात होती. आम्ही बसमध्ये चढलो. सुदैवाने बसायला जागा मिळाली. बसल्या जागी मित्रांच्या सोबतीने माझी स्पर्धेची तयारी पुढे चालू झाली.

आम्ही दोघ मित्र चर्चेत पूर्ण बुडालो होतो. किती वेळ गेला, कुणास ठाऊक. तेवढ्यात बसमध्ये गोंधळाचे आवाज सुरू झाले. काहीजण तर बसच्या एका बाजूला जमा झाले होते आणि ‘बस थांबवा, बस थांबवा’ असा एकच गलका करीत होते. आम्ही सुद्धा गडबडलोच. म्हटले, झाले तरी काय? आम्ही पटकन आमचे दप्तर आवरले आणि सावध होऊन उभे राहिलो. काही क्षणांतच घडलेला प्रकार आमच्या लक्षात आला आणि आम्हीसुद्धा मनातून हादरलोच.

आमच्या बसमध्ये कोणीतरी आपली बॅग विसरून गेला होता. विसरला होता की मुद्दाम ठेवली होती? एवढी मोठी बॅग कोण विसरेल कसा काय ? चालक बस थांबवत का नव्हते? वाहक सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. सगळ्यांना वाटत होते की बॅगमध्ये बॉम्ब आहे. आम्हांलासुद्धा मनातून धाकधूक वाटत होतीच. मधूनच वाटे की, खरोखरच, कोणीतरी विसरलाच असणार. पण कशावरून? खात्री काय? बॉम्ब नसेल कशावरून? बाहेर पाहिले, तर आणखी नवलच! पोलिसांच्या दोन गाड्या बसच्या मागेपुढे चालत होत्या. मोटरसायकलवरूनही पोलीस सोबत येत होते. म्हणजे पोलिसांपर्यंत बातमी पोहोचली होती तर! पोलिसांना पाहून हायसे वाटले आणि भीतीही वाटली. आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. तरी बाबा सकाळी सांगत होते– “सांभाळून जा. आजूबाजूला लक्ष ठेव.”

तेवढ्यात रस्त्यालगतच्या एका मैदानात बस थांबली. आम्ही भराभरा बाहेर पडलो. पण पोलिसांनी आम्हां प्रवाशांना त्यांच्या गाडीत बसवले आणि बसपासून दूर नेले. बघ्यांना पिटाळले. आम्हां प्रत्येकाचे ओळखपत्र तपासले. प्रत्येकाची माहिती लिहून घेतली. आम्हांला तिथून हलण्याची परवानगी नव्हती. सगळ्यांचे मोबाईल त्यांनी ताब्यात घेतले. एकेका गोष्टीने प्रकरणाचे गांभीर्य वाढत होते आणि पोटातला भीतीचा खड्डा वाढत होता. पोलिसांची एक एक गाडी येत होती. त्यांची संख्या वाढत होती. एव्हाना त्या परिसराला पोलिसांचा गराडाच पडला होता.

आम्ही पोलिसांच्या ताब्यात असल्याने आमच्या आसपासच त्यांचा वावर चालू होता. त्यांच्या बोलण्यातून आम्हांला बित्तंबातमी कळत होती. तेवढ्यात बॉम्बशोधक पथकही हजर झाले. पोलिसांनी भराभर वाळूच्या पोत्यांची भिंत उभारून त्या बॅगेसाठी एक हौद उभारला. बॉम्बशोधकांनी खास पोशाख अंगावर चढवला. ती बॅग त्या हौदात ठेवली. पोत्यांच्या भिंतीला एक खिडकी ठेवली होती. बॉम्बशोधक जवान सरपटत त्या खिडकीपर्यंत गेले. काही उपकरणे घेतली आणि खिडकीतून आत डोकावत आपले कार्य सुरू केले. इकडे बाहेर सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. आमच्या श्वासोच्छ्वासाचे आवाज आम्हांला ऐकू येत होते! सगळेजण डोळ्यांच्या दुर्बिणी करून ते दृश्य बघत होते. काय होईल? बॉम्बस्फोट होईल का? किती मोठा असेल? आमचे हातपाय थरथरत होते. आम्हांला सर्वांना जमिनीवर आडवे व्हायला लावले होते. प्रसंगातला थरार आमच्या अंगावर, आमच्या आवाजात जाणवत होता.

अर्ध्या तासानंतर ते जवान उभे राहिले. बसमध्ये सापडलेल्या बॅगेत बॉम्बच होता! आणि त्या जवानांनी तो निकामी केला होता! त्यांनी तसा इशारा करताच आम्ही उत्स्फूर्ततेने जल्लोष केला. आम्ही पोलिसांकडून आपापले मोबाईल ताब्यात घेतले आणि भराभर फोन केले. ही बातमी आधीच सर्वत्र पसरली होती. पण आम्ही अडकल्याची कोणाला कल्पनाच नव्हती. आमची स्पर्धा पुढे ढकलली होती. त्यानंतर आम्ही कितीतरी वेळ त्या प्रसंगाबद्दलच बोलत होतो. कितीतरी वेळ तो थरार आम्ही अंगावर वागवीत होतो.

हा प्रसंग मी आयुष्यात कधीही विसरणार नाही

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

  • अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध दाखवा / Avismarniya Prasang Marathi Nibandh
  • एक अविस्मरणीय प्रसंग वर मराठी निबंध / Ek Avismarniya Prasang Nibandh In Marathi
  • माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध लेखन करा / Write Essay On Avismarniya Prasang In Marathi

तुम्हाला अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध / Essay Writting On Avismarniya Prasang In Marathi हे निबंध लेखन कसे वाटले ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा धन्यवाद,

WhatsApp Group Join Group