असा रंगला सामना मराठी निबंध | Asa Rangla Samna Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

मित्र आणि मैत्रणींनो या पोस्ट मध्ये आपण  असा रंगला सामना मराठी निबंध /  Asa Rangla Samna Essay In Marathi  हे निबंध लेखन करणार आहे.

Asa Rangla Samna Essay In Marathi

Asa Rangla Samna Essay In Marathi
(मुद्दे : राज्यपातळीवरील कबड्डीचे सामने अंतिम सामना -प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू तुलनेने ताकदवान तो संघ वरचढ ठरू लागला आम्हांला हिणवणारे नारे सुरू झाले मी ‘कबड्डी, कबड्डी’ करीत प्रतिस्पर्धी संघात घुसलो मला पकड घातली गेली मी हिसका दिला -आमच्या बाजूला परतलो- आमचे खेळाडू एक एक जिवंत नूर पालटला- आम्ही जिंकलो.)

आमच्या महाविदयालयाने राज्यपातळीवरचे कबड्डीचे सामने आयोजित केले होते. सबंध राज्यातील विविध भागांतून अनेक संघ स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते. त्यामुळे एकाच वेळी अनेक सामने खेळले जात होते. आमचा कबड्डीचा संघ या स्पर्धेत उतरला होता. मी या संघातील एक खेळाडू होतो. आमचा संघ अगदी कसलेला होता. गायकवाड सर आणि तांबे सर यांनी मुलांकडून भरपूर सराव करून घेतला होता.

आम्हां मुलांना रोजच्या व्यायामातदेखील कधी सवलत मिळत नसे. त्यामुळे आमच्या संघातील मुले अगदी चपळ बनली होती. प्रतिपक्षाच्या पकडीतून कसे निसटावे, याचे तंत्र आम्ही चांगलेच आत्मसात केले होते. असा हा आमचा संघ अंतिम फेरीपर्यंत आला नसता, तरच नवल! आमचा अंतिम सामना धुळ्याच्या एका नावाजलेल्या कबड्डी संघाबरोबर होता.

सामना सायंकाळी चार वाजता सुरू होणार होता; पण तीनपासूनच सारे मैदान भरून गेले होते. दोन्ही संघ आमनेसामने उभे ठाकले आणि अखेर सामना सुरू झाला. धुळे संघातील खेळाडू आमच्या खेळाडूंच्या तुलनेने बरेच ताकदवान दिसत होते. आमच्या मित्रांचा या मल्लांपुढे कसा निभाव लागणार, अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. पंचांनी शिटी कुंकली.

आमच्या कप्तानाने नाणेफेक जिंकून खेळायला सुरुवात केली होती. पण शेवटी माझ्या मनातील भीतीच खरी ठरली. त्या संघातील एका बलदंडाने आमच्या कप्तानाची अगदी सहजगत्या उभ्या उभ्याच पकड केली होती. सुरुवातीलाच कप्तान बाद झाल्याने आमच्या संघातील खेळाडूंचा धीर खचला आणि ते पटापट बाद होऊ लागले. प्रतिस्पर्धी संघ पाहुणा असल्यामुळे त्यांच्या बाजूचे प्रेक्षक कमी होते.

पण इतर संघांचे खेळाडू आम्हांला खिजवण्यासाठी विरुद्ध संघाचीच बाजू घेत होते. आमचे उत्साही आवाज बंद झाले. ‘शेम, शेम’ व ‘हिप् हिप् हुर्यो’ च्या आवाजांनी वातावरण भरून गेले. आता आमच्या संघाचा फक्त मी एकच खेळाडू मैदानात उरलो होतो. पराभवाचे सावट स्पष्ट दिसू लागले होते. पण मी डगमगलो नाही. ‘कबड्डी-कबड्डी’ करीत मी प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात शिरलो. अगदी सरळ आत घुसलो. तेव्हा प्रतिस्पर्थ्यांनी माझी पकड केली.

पण विलक्षण आवेगाने हिसका देऊन मी आपल्या बाजूला परतलो आणि त्याच क्षणी खेळाचा सारा नूरच पालटला. मी तीन खेळाडू बाद केले होते. त्यामुळे आमचे तीन खेळाडू जिवंत झाले होते. आमची ताकद वाढली. आमचा उत्साहही प्रचंड वाढला. नंतर तर आमचे सर्व खेळाडू एक-एक करून जिवंत झाले आणि विरुद्ध संघात केवळ एकच खेळाडू उरला.

आता सामन्यावर आमची पकड घट्ट बसली होती आणि ती शेवटपर्यंत सुटली नाही. साहजिकच, सामना आम्ही जिंकला होता. आमच्या महाविदयालयातील विदयार्थ्यांनी फक्त मैदान डोक्यावर घ्यायचे तेवढे बाकी ठेवले होते! राज्यपातळीवर आमचा संघ विजयी ठरला. आम्हा विजयी खेळाडूंची जंगी मिरवणूक निघाली, सत्कार झाले. असा हा चुरशीचा सामना माझ्या महाविदयालयीन जीवनातील सुवर्णमोलाची घटना ठरली आहे.

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा लिहू शकता

  • असा रंगला सामना निबंध मराठी / asa rangala samana nibandh marathi
  • सामना निबंध मराठी / samana nibandh marathi
  • कबड्डी खेळ मराठी निबंध / kabaddi game nibandh marathi

हे निबंध सुद्धा वाचा :

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा असा रंगला सामना मराठी निबंध / Essay On Marathi On Asa Rangala Samna  कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

WhatsApp Group Join Group