विमानाचा शोध, शास्त्र आणि इतिहास | प्राचीन विमानाची माहिती | Ancient Aircraft Information In Marathi

विमानाचा शोध, शास्त्र आणि इतिहास

आचार्य विश्वंभरांनी केलेली (Ancient Aircraft Information)विमानाची व्याख्या अत्यंत अर्थवाही असून त्या काळी स्वर्गलोक, तसेच विविध ग्रहांवर जाणारी अंतराळ विमाने होती, हे स्पष्ट होते. तसे प्रसंगही प्राचीन साहित्यात वर्णिलेले आहेत.

प्राचीन विमानांचे प्रकार-प्राचीन विमानांचे माहिती  :

१. मंत्र विमान :

त्रेतायुगात मंत्रविमाने वापरात होती. मंत्र आणि सिद्धींच्या साहाय्याने त्या काळातील व्यक्ती एका ठिकाणाहून इच्छितस्थळी आकाशमार्गे वेगाने प्रवास करत असत. शौनकऋषींच्या सूत्रानुसार त्रेतायुगात पंचवीस प्रकारची मंत्रविमाने होती.

२. तांत्रिक विमान :

द्वापरयुगात छप्पन्न प्रकारची तांत्रिक विमाने होती. तंत्रविमानात पंचमहाभूतांतील शक्ती आणि गुण यांचा वापर मंत्रशक्तीच्या बरोबरीने करण्यात आला होता. म्हणजेच तंत्रविमानात मंत्रशक्तीला वनस्पती, खनिजे आदींच्या शक्तीची वा ऊर्जेची जोड दिली जायची.

३. कृतक विमान (यांत्रिक विमान) :

द्वापरयुगात शेवटच्या काळात मंत्रसिद्धी तसेच योगसिद्धी प्राप्त असलेले पुरुष कमी झाले. अशा काळात आकाशमार्गे प्रवास अशक्य झाला. त्या वेळी महर्षींनी कृतक विमान म्हणजेच यंत्रविमाने बनवली. यंत्रविमाने पंचवीस प्रकारची होती.
बत्तीस प्रकारची विमानरहस्ये (Operating Systems)
विमानचालकाला विमानकर्मी हा शब्दप्रयोग आहे. तसेच विमानचालन पद्धतीकरता विमानरहस्य हा शब्दप्रयोग आहे. प्राचीन विमान रचनाकारांना बत्तीस विमानरहस्ये अवगत होती. त्या रहस्यांची वर्णने मनोवेधक आणि विचारप्रवर्तक आहेत.

प्राचीन विमान विविध यंत्र :

१. वैश्वानरनाल यंत्र :

विमानातील स्वयंपाकघरातील अग्नीनिर्मितीसाठी या यंत्राचा उपयोग करत. एल्.पी.जी. वायूपेक्षा किती तरी पटीने सुरक्षित या यंत्राचा उपयोग कारखाने आणि शीत प्रदेशात घरे उष्ण ठेवण्यासाठी तसेच स्वयंपाकघरातही होऊ शकतो.

२. गुहागर्भदर्श यंत्र :

जमिनीत गुप्तपणे पुरलेल्या विमानवेधी तोफांना शोधून काढण्याकरता हे यंत्र होते. रेडिओ दुर्बिणीसारख्या वाटणार्या या यंत्राची पुनर्निर्मिती आणि विकास केल्यास ते एक तुलनात्मक स्वस्त आणि अत्यंत प्रभावी उपकरण ठरेल.

३. पृथ्वीवर तसेच अंतरिक्ष प्रवासासाठी ऊर्जानिर्मिती :

प्राचीन विमानातील ७ शक्तीयंत्रांपैकी ३ यंत्रांच्या उपयोगाने चंद्र, सूर्य आणि अवकाशापासून ऊर्जानिर्मिती करत.

४. आकाशस्थ विजेपासून संरक्षण यंत्रणा :

विद्युतदर्पण यंत्रणा या विषयाची माहिती सांगतांना महर्षी भारद्वाजांनी आकाशातील वीज, त्यामुळे होणारी विमानाची हानी आणि ती टाळण्याचे उपाय यांचे विश्लेषण केले आहे. आजचे विज्ञान प्रगत असले, तरीही वीज पडल्याने अपघात होतातच.

५. प्राचीन भारतीय विमानांचे वर्णन आणि उडत्या तबकड्यांचे वर्णन यात समानता आहे.

भारद्वाजसंहिता या ग्रंथामध्ये विमाने कशी निर्माण करावीत, याची वर्णने आहेत, तसेच विविध प्रकारच्या विमानांचे आराखडेही दिलेले आहेत.
– स्वामी दत्तावधूत (मानवी जीवनातील गूढ रहस्ये – भाग २)

काही प्राचीन विमानांचे प्रकार :

१. शकुन विमान :

हे विमान राजलोहापासून बनवत. या विमानाचा आकार चौकोनी, गोल वा लंबगोल असे. या विमानात चार शक्तीयंत्रे असत. खनिज तेलाच्या टाकीतून आलेली तेलनळी, एक पाण्याची नळी, एक हवेची नळी या तीन नळ्या शक्तीयंत्रातील मुख्य भागात आणलेल्या असत. या ठिकाणी विजेच्या साहाय्याने तापवलेली भट्टी असे. येथे तीन नळ्यांतील पदार्थांचे अतीउष्ण भट्टीत मीलन झाले की, मोठ्या शक्तीचा वायू तयार होत असे. या वायूला हव्या त्या दिशेने वळवून बाहेर सोडणारी वातचोदनयंत्र नावाची यंत्रणा असे. शक्तीयंत्रात लागणार्या विद्युत शक्तीसाठी विमानाच्या बाहेरील बाजूला किरणाकर्षणमणी नावाची यंत्रणा असे. यांत्रिक पद्धतीत दोन पंखांची हालचाल करणार्या या विमानात एकावर एक असे तीन प्रवासी कक्ष असत.

२. सुंदर विमान :

सहासष्ट फूट लांबी-रुंदीचा चौकोनी अथवा सहासष्ट फूट व्यासाचा वर्तुळाकार असलेला विमानाचा मुख्य ढाचा राजलोहाचा असायचा. या विमानासुयोग्य आकाराची मोठी टाकी म्हणजे वाफ केंद्र असे. या टाकीत विशिष्ट तेल आणि पाणी यांना योग्य उष्णता देऊन त्याची धूरसदृश वाफ बनवली जाई. निर्माण झालेली वाफशक्ती नलिका रचनेत सोडली जात असे. या नलिकांच्या आतील बाजूस फिरणारी चाके असत. या तीन चाकांच्या जोडणीत तीन वायूस्थित्यक चकत्या असत. अशा पद्धतीने ही वाफ शक्तीउत्सर्जन केंद्रात येत असे. हे उत्सर्जन केंद्र धूमगर्म धातूपासून बनवलेले असे.

चाळीस नलिकांच्या रचनेच्या साहाय्याने अतीशक्तीशाली अशा वाफांच्या उत्सर्जनामुळे विमानाचे उड्डाण आणि वेग वाढत असे. सुंदर  विमानाचा वेग ताशी आठ हजार मैल (१२ हजार ८०० कि.मी.) असा होता. हे विमान मोठ्या पल्ल्याचे अंतर पार करण्यासाठी अथवा एका ग्रहावरून दुसर्या ग्रहावर जाण्यासाठी वापरले जात असावे, असे अनुमान काढता येते.

तर मित्रांनो या बद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेन्ट करून विचारू शकता धन्यवाद,..

Leave a Comment