आमची मुंबई मराठी निबंध | Aamchi Mumbai Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो या पोस्ट मध्ये आपण  आमची मुंबई मराठी निबंध /  Mumbai Essay In Marathi हे निबंध लेखन करणार आहे.

Aamchi Mumbai Marathi Nibandh

निबंधलेखन वर्णनात्मक निबंध – आमची मुंबई

(मुद्दे : मुंबई ही मोहमयी नगरी – देशोदेशींचे लोक येथे येतात – सात बेटांनी बनलेले शहर – वाहतुकीची विपुल साधने – मनोरंजनाच्या सोयी – उद्योग- व्यवसाय – भारताचे छोटे रूप )

मुंबई ही एक जागतिक कीर्ती लाभलेली मोहमयी नगरी आहे. संपूर्ण जगातून असंख्य लोक हे मुंबईत येत असतात. म्हणून तर आमची मुंबई नाना तर्हेच्या लोकांनी फुलून गेलेली आहे.

मुंबई ही आमच्या महाराष्ट्रा ची राजधानी आहे. मुळात मुंबई शहर सात बेटे जोडून निर्माण झालेली आहे. मुंबई ही एकदम सोयीस्कर बंदर आहे.येथे विस्तीर्ण रस्ते व अनेक महाकाय उड्डाणपूल झालेले आहेत. तसेच बसगाड्या, रेल्वे,  टॅक्सी, रिक्षा यांसारख्या सर्व वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत. येथील रस्त्यांवरून रोज लाखों मध्ये वाहने धावतात.

मुंबईत उत्तमोत्तम शाळा-कॉलेज आहेत. उत्तमोत्तम चित्रपट आणि नाट्य गृहे आहेत. सूंदर सुंदर असे बागबगीचे आहेत. जिजामाता उद्यान हे सर्वांचे आवडते प्राणी संग्राहलय आमच्या मुंबई मध्ये आहे. सुप्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यान देखील आमच्या मुंबई मध्ये आहे.

आमच्या मुंबईत अनेक कारखाने आहेत. आमच्या मुंबईत अनेक व्यवसाय-उद्योग चालतात. काम करणाऱ्यांसाठी कोणालाही येथे पोट भरता येते. त्यामुळे तर सगळीकडून लोक आमच्या मुंबई मध्ये येतात. आमच्या मुंबई मध्ये सर्व जातीधर्माचे, विविध, भाषा बोलणारे लोक गुण्यागोविंदाने राहू शकतात. त्यामुळे संपूर्ण भारताचे दर्शन आमच्या मुंबई मध्ये घडते. म्हणूनच मला आमची मुंबई खूप आवडते

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा लिहू शकता

  • माझी मुंबई निबंध मराठी / majhi mumbai nibandh marathi
  • आमची मुंबई निबंध मराठी / aamchi mumbai nibandh marathi
  • मुंबई मराठी निबंध / mumbai nibandh marathi

हे निबंध सुद्धा पहा

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा माझी मुंबई मराठी निबंध / My Mumbai Essay In Marathi कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

Leave a Comment